घरक्रीडाहैद्राबादच्या प्रवासाला पूर्णविराम; अटीतटीच्या सामन्यात दिल्लीची बाजी

हैद्राबादच्या प्रवासाला पूर्णविराम; अटीतटीच्या सामन्यात दिल्लीची बाजी

Subscribe

दिल्ली आणि हैद्राबाद यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत दिल्लीने आपले २ गडी हैदराबादवर विजय मिळवला. या विजयासह दिल्लीने दुसऱ्या क्वालीफाय सामन्यात आपले स्थान निश्चित केले.

वृषभ पंतने केलेल्या जबरदस्त फलंदाजीमुळे अटीतटीच्या सामन्यात दिल्लीने बाजी मारली. हा सामना आयपीएलच्या १२ व्या हंगामातील प्ले-ऑफमधील इलिमीनीटर सामना होता. या सामन्यात दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात चुरशीची लढाई पहायला मिळाली. शेवटच्या चेंडुपर्यंत हा सामना रंगला. परंतु, अंतिम टप्प्यात दिल्लीने हा सामना खिशात घातला. दिल्लीने आपले २ गडी राखत हैदराबादचा पराभव केला. विशाखापट्टणम येथे हा सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीच्या गोलंदाजांनी केलेल्या माऱ्यांचा सामना करत हैद्राबादने १६२ धावांपर्यंत मजल मारली.

हैद्राबादने दिलेल्या १६३ धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना दिल्लीची देखील अवस्था बिकट झाली. दिल्लीचा वाघ सलामीवीर शिखर धवन स्वस्तात तंबूत परतला. त्याने १६ चेंडूत १७ धावा केल्या. पृथ्वी शॉने अर्धशतक केले. मात्र मधल्या फळीतील फलंदाजांची साथ न मिळाल्याने दिल्लीवर शेवटच्या षटकांमध्ये दबाव वाढला. कर्णधार श्रेयस अय्यर अवघ्या ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर वृषभ पंतने जबदस्त फटकेबाजी करत दिल्लीला यशाच्या शिखराजवळ पोहोचवले. एकीकडे एकामागून एक फलंदाज बाद होत असताना वृषभ पंतने कुठल्याही प्रकारचा दबाव न येऊ देता फटकेबाजी सुरू ठेवली. त्याने ५ षटके आणि २ चौकार लगावले. परंतु, फटकेबाजीच्या नादात तो झेलबाद झाला. त्यामुळे त्याला अर्धशतकापासून मुकावे लागले. त्याने २१ चेंडूत ४९ धावा केल्या. त्यानंतर पाॅलने शेवटच्या चेंडूवर चौकार मिळवून सामना जिंकवून दिला. दिल्लीने २ गडी राखत हैद्राबादवर विजय मिळवला.

- Advertisement -

प्रथम फलंदाजासाठी आलेल्या हैद्राबादची सुरुवात खराब ठरली. सलामीवीर वृद्धीमन शहा स्वस्तात परतला. त्याने ९ चेंडूत ८ धावा केल्या. त्यानंतर मार्टिन गुप्तील देखील बाद झाला. त्याने १९ चेंडूत ३६ धावा केल्या. परंतु, उंच फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. मनिष पांडेदेखील झेलबाद झाला. त्याने ३६ चेंडूत ३० धावा केल्या. त्यानंतर कर्णधार केन विल्यम्सचा इशांत शर्माने त्रिफळा उडवला. त्याने २७ चेंडूत २८ धावा केल्या. त्यानंतर विजय शंकर आणि मोहम्मद नाबी २५ आणि २० धावा करुन बाद झाले. दिपक हुडा ४ धावा करुन धावबाद झाला. त्यानंतर रशिद खान शुन्यावर बाद झाला. २० षटकांत हैद्राबादने ८ बाद १६२ धावा केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -