घरक्रीडाDC VS PBKS : अटीतटीच्या सामन्यात पंजाबचा विजय; दिल्ली कॅपिटल्सचा 4 विकेट्सने...

DC VS PBKS : अटीतटीच्या सामन्यात पंजाबचा विजय; दिल्ली कॅपिटल्सचा 4 विकेट्सने पराभव

Subscribe

चंदीगड : इंडियन प्रीमिअर लीग आयपीएलच्या 17 व्या पर्वातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात चंदीगडच्या महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 174 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने सहा विकेट गमावत हा सामना जिंकला. (DC VS PBKS Punjab win in the match Delhi Capitals lost by 4 wickets)

हेही वाचा – Liquor Policy Case : केजरीवाल यांच्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर अटकेची टांगती तलवार?

- Advertisement -

पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकत दिल्ली कॅपिटल्सला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 9 विकेट गमावत 174 धावांचा डोंगर उभा केला. मात्र प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने सॅम कुरनच्या अर्धशतकाच्या जोरावर अटीतटीच्या सामन्यात 4 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकवून दिला. 175 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जने शानदार सुरुवात केली आहे. धवन आणि बेअरस्टो यांच्यात पहिल्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी झाली. धवनने 16 चेंडूत 22 धावा केल्या. जॉनी बेअरस्टो 9 धावा करून धावबाद झाला. प्रभसिमरन सिंगने 17 चेंडूत 26 धावांची खेळी केली. जितेश 9 धावा करून बाद झाला. त्याचवेळी पंजाबकडून सॅम करनने सर्वाधिक 63 धावा केल्या. दरम्यान, दिल्लीकडून कुलदीप यादवने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.

हेही वाचा – Onion Export Ban : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी अनिश्चित काळापर्यंत वाढवली

- Advertisement -

तत्पूर्वी, 15 महिन्यांनंतर पुनरागमन करणाऱ्या ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 174 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांच्यात पहिल्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी झाली. सलामीवीर मिशेल मार्श 12 चेंडूत 20 धावा करून बाद झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नरही 21 चेंडूत 29 धावाच करू शकला. त्यानंतर शाई होपने 25 मध्ये 33 धावांचे योगदान दिले. तर ऋषभ पंतने 13 चेंडूत 18 धावांची खेळी केली. याशिवाय अक्षर पटेल 13 चेंडूत 21 धावा करून धावबाद झाला. अभिषेक पोरेलने 10 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 32 धावांची धमाकेदार खेली केली. मात्र मात्र रिकी भुई 3 आणि ट्रिस्टन स्टब्स फक्त 5 धावाच करून शकले. पंजाबकडून अर्शदीप आणि हर्षलने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -