घरक्रीडाIPL 2022 : याला म्हणतात कामगिरी! तीन सामने, तीन विजय, तीन वेळा...

IPL 2022 : याला म्हणतात कामगिरी! तीन सामने, तीन विजय, तीन वेळा हाच खेळाडू ठरला सामनावीर

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगचा पंधरावा हंगाम मध्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. IPL 2022 च्या पहिल्या फेरीत काही खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीने जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यापैकी एक चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव!

कुलदीप यादवची गेल्या दोन वर्षांतील कामगिरी अत्यंत खराब होती. अनेकांनी त्याच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र, IPL 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघात सामील झाल्यापासून कुलदीपचा खेळ एका वेगळ्याच पातळीवर जाऊन पोहोचला आहे. चालू हंगामात तो पर्पल कॅपच्या शर्यतीत कायम आहे. पंजाब किंग्जविरुद्ध बुधवारी कुलदीपने ४ षटकांत २४ धावा देत २ बळी घेतले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

- Advertisement -

दिल्लीचा तिसरा विजय, कुलदीप तिसऱ्यांदा सामनावीर ठरला

कोरोना संकटाशी झुंज देत दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जविरुद्ध शानदार गोलंदाजी करत संघाला ११५ धावांत गुंडाळले. यानंतर, दिल्लीने पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नरच्या धमाकेदार खेळीमुळे ९ विकेट्ससह ११६ धावांचे लक्ष्य १०.३ षटकांत पूर्ण केले. सीझनमध्ये खेळल्या गेलेल्या ६ सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा हा तिसरा विजय ठरला. सर्वात मनोहत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्लीने तिन्ही वेळा विजय मिळवला आहे आणि तिन्ही सामन्यांमध्ये कुलदीप यादवला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे.

कुलदीपचे ६ सामन्यात १३ विकेट

कुलदीपच्या अशा दमदार कामगिरीनंतर उत्सुकताही वाढली आहे. तो चांगल्या फॉर्ममध्ये गोलंदाजी करतोय. योग्य ठिकाणी चेंडू टाकण्यात तो यशस्वी होतोय. अचूक टप्पा ठेवत असल्यामुळे त्याला विकेट्सही मिळत आहेत. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ६ सामन्यांच्या ६ डावात गोलंदाजी करताना कुलदीपने १४.३० च्या सरासरीने आणि ७.८५ च्या इकॉनॉमीने १३ बळी घेतले आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही १०.९२ आहे म्हणजेच प्रत्येक अकराव्या चेंडूवर विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला आहे.

- Advertisement -

कुलदीपसाठी ब्रेबॉर्न ठरतंय लकी

ब्रेबॉर्न स्टेडियमही कुलदीप यादवसाठी खूप लकी ठरले आहे. या मैदानावर खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांमध्ये कुलदीपने १३ पैकी ९ विकेट घेतल्या आहेत. या मैदानावर त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध १८ धावांत ३, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ३५ धावांत ४ आणि पंजाब किंग्जविरुद्ध २४ धावांत २ बळी घेतले आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाने तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. याशिवाय खेळलेल्या इतर तीन सामन्यांमध्ये कुलदीपला ४ विकेट घेता आल्या.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -