घरक्रीडा८५ मीटरच्या पलीकडे छक्का गेला तर अट्ठा द्या

८५ मीटरच्या पलीकडे छक्का गेला तर अट्ठा द्या

Subscribe

माजी क्रिकेटपट्टू डीन जोन्स यांची अजब मागणी

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी एक नवीन नियम सुचवला आहे ज्यानुसार टी२० सामन्यात जो सिक्स ८५ मीटरच्या पुढे जाईल त्याला सहा ऐवजी आठ रन्स देण्यात यावे. ज्यामुळे खेळातील उत्सुकता आणखी वाढेल. अधिकाधिक प्रेक्षक या खेळाशी जोडले जातील. रविवारी आयपीएलचा अंतिम सामना होत आहे. त्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सवरील “डगआउट” या कार्यक्रमादरम्यान बोलताना डीन यांनी सांगितले की “आजकाल टी-२० कडे बरेच प्रेक्षक खेचले जात आहेत ज्याचा परिणाम कसोटी क्रिकेटवर होताना दिसत आहे. क्रिकेटला आणखी रंगतदार बनविण्यासाठी जर सिक्स ८५ मीटरहून लांब गेला तर त्याला आठ रन्स देण्यात यावे. ज्यामुळे गेल, रसेल आणि इतर मोठे फटके मारणाऱ्या खेळाडूंची बॅटींग पाहण्यात आणखी मजा येईल”
हा नियम केवळ टी-२० मध्ये आणण्याचे कारण असे की, बऱ्याचदा शेवटच्या ओव्हरमध्ये बरेच रन हवे असतात अशा वेळी या नियमाने नक्की सामना आणखी रंगतदार होईल. इतर फॉरमॅटमध्ये शक्यतो इतक्या चुरशीची सामने होत नाहीत त्यामुळे या नियमाची इतर फॉरमॅट्स मध्ये जास्त गरज नाहीये. असेही जोन्स यांचे म्हणणे आहे.

बदलते क्रिकेट

सुरूवातीला जेंटलमेंन्सचा खेळ समजला जाणाऱ्या क्रिकेटमध्ये आजकाल बरेच नवनवीन प्रयोग केले जात आहेत. खेळाडू वेगवेगळ्या प्रकारचे शॉट्स खेळताना दिसत आहेत, असे शॉट्स खेळणाऱ्या बॅट्समन्सना आणखी रन मिळणार असल्यास ते अजून जोमाने खेळतील, असेही जोन्स यांचे म्हणणे आहे.
१८८०च्या काळात तर पाच आणि सहा रन मिळत ज्यामध्ये जर बॉलने योग्यप्रकारे मैदान पार केल्यास सहा रन मिळत अन्यथा पाच रनांवर समाधान मानावे लागत असे. १९१०ला या नियमात बदल केला गेला आणि बॉल थेट मैदानाबाहेर गेल्यावर सहा रन देण्याचा नियम तयार केला गेला. ज्यात आता पुन्हा बदल करण्याचा सल्ला जोन्स यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -