घरक्रीडामुंबई इंडियन्स संघात death over specialist अष्टपैलू दाखल; जोफ्रा आर्चर IPL मधून...

मुंबई इंडियन्स संघात death over specialist अष्टपैलू दाखल; जोफ्रा आर्चर IPL मधून बाहेर

Subscribe

मुंबई : IPL 2023 च्या 16 व्या हंगामात आज  मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आमनेसामने येणार आहेत. हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असताना मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची आणि एक वाईट बातमी आहे. मुंबईचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) पुनर्वसनासाठी घर परतणार आहे, तर त्यांच्या जागी मुंबईने डेथ ओव्हर स्पेशलिस्ट अष्टपैलूंला संघात सामिल केले आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडिवर आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणारा सामना दोन्ही संघासाठी Play Off च्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. आज जो संघ सामना जिंकेल तो चौथ्या क्रमांकावर पोहचणार आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला गेल्या काही सामन्यांपासून फिटनेसची चिंता सतावत होती. त्यामुळे त्याने पुनर्वसनासाठी घरी जाण्यायचा निर्णय घेतला असल्यामुळे तो आयपीएलच्या उर्वरीत सामन्यात खेळताना दिसणार नाही आहे.

- Advertisement -

जोफ्राच्या जागी मुंबईने इंग्लंडचा अष्टपैलू ख्रिस जॉर्डनला (Chris Jordan) करारबद्ध केले आहे. मुंबई इंडियन्सने ख्रिस जॉर्डनला त्याची मूळ किंमत २ कोटी रुपयांसह करारबद्ध करत संघात घेतले आहे. हा खेळाडू आतापर्यंत आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसला आहे.

- Advertisement -

मुंबई इंडियन्सने ट्विटरवर अधिकृत घोषणा करताना म्हटले की, “ख्रिस जॉर्डन आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघात सामील होणार आहे. आर्चरची जागा ख्रिस जोफ्रा घेत आहे. जोफ्राच्या रिकव्हरी आणि फिटनेसवर इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून लक्ष ठेवले जात आहे. त्याच्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तो मायदेशी परतेल.’

जोफ्रा आर्चरची आयपीएल कारकिर्दी
जोफ्रा आर्चर 2022 मध्ये दुखापतग्रस्त होता, पण आयपीएल 2023 चा विचार करून मुंबई इंडियन्सने त्याला आयपीएल 2022 च्या लिलावात 8 कोटी रुपयांना विकत घेतले होते. जोफ्रा आर्चर यंदाच्या हंगामात सामिल झाला, पण तो संघासाठी फार चांगली कामगिरी करू शकला नाही. आर्चरने या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांमध्ये फक्त 2 विकेट घेताना 9.50 च्या सरासरीने धावा खर्च केल्या आहेत. आर्चरच्या एकूण आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 40 सामन्यांमध्ये 48 विकेट घेतल्या आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -