घरक्रीडा...म्हणून २००८ ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेणे टाळले - कुंबळे

…म्हणून २००८ ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेणे टाळले – कुंबळे

Subscribe

या कसोटी मालिकेतील सिडनी कसोटी बरीच वादग्रस्त ठरली होती.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २००८ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेली चार सामन्यांची कसोटी मालिका चांगलीच गाजली. या मालिकेतील सिडनी कसोटी बरीच वादग्रस्त ठरली होती. या सामन्यात हरभजन सिंग आणि अँड्र्यू सायमंड्स यांच्यातील ‘मंकीगेट’ प्रकरण झाले. सामन्यादरम्यान हरभजनने माझ्यावर वर्णभेदी टीका केली, असा आरोप सायमंड्सने केला होता. हरभजनने आरोप फेटाळून लावल्यानंतरही आयसीसीने त्याच्यावर तीन सामन्यांची बंदी घातली होती. मात्र, भारतीय संघाने या निर्णयाविरोधात दाद मागितली, तसेच ते ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेण्याच्या विचारात होते. मात्र, आम्ही दौऱ्यातून माघार घेणे टाळले, कारण आम्हाला चाहत्यांसमोर उदाहरण ठेवायचे होते, असे तेव्हाच्या भारतीय संघाचा कर्णधार अनिल कुंबळे म्हणाला.

ऑस्ट्रेलियात जिंकण्यासाठी गेलो होतो

कर्णधार असताना मैदानात निर्णय घेण्याची जबाबदारी तुमच्यावर असते. मात्र, इथे परिस्थिती वेगळी होती. मला मैदानाबाहेर एक निर्णय घ्यावा लागणार होता. त्यावेळी आम्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेण्याविषयी बरीच चर्चा सुरु होती. भारतीय संघाने दौरा अर्ध्यातच सोडावा आणि मायदेशी परतावे असे म्हटले जात होतो. भारतीय संघाला चुकीची वागणूक मिळाल्याने त्यांनी दौऱ्यातून माघार घेतली, हे लोकांना पटले असते. त्यांनी आमच्या निर्णयाला विरोध दर्शवला नसता. मात्र, आम्हाला चाहत्यांसमोर उदाहरण ठेवायचे होते. कठीण परिस्थितीतही आम्ही जिंकू शकतो हे आम्हाला दाखवायचे होते. आम्ही ऑस्ट्रेलियात जिंकण्यासाठी गेलो होतो. सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर आम्ही मालिका बरोबरीत संपवण्याचा प्रयत्न करत होतो, असे कुंबळे म्हणाला. अखेर हरभजनवरील बंदी हटवण्यात आली आणि दंड म्हणून त्याच्या सामन्याच्या रकमेतील ५० टक्के रक्कम कापण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -