घरक्रीडाश्रीलंका दौर्‍याबाबतचा निर्णय काही काळाने

श्रीलंका दौर्‍याबाबतचा निर्णय काही काळाने

Subscribe

आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंधांबाबत अधिक स्पष्टता आल्यानंतरच भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौर्‍याबाबत निर्णय घेणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. विराट कोहलीचा भारतीय संघ जुलैमध्ये श्रीलंकेच्या दौरावर जाणार असून या दौर्‍यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने होणार आहेत. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द होण्याची किंवा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

श्रीलंका दौर्‍याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. कारण जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंधांत काही बदल होणार का, हे आताच सांगणे अवघड आहे. याबाबत अजून स्पष्टता नाही. त्यामुळे आम्ही काही काळ वाट पाहणार आहोत आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ, असे बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी सांगितले.

- Advertisement -

भारतामध्ये ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा असून यात प्रवासावर निर्बंध कायम आहेत. तसेच श्रीलंकेतही किमान या महिन्याच्या अखेरपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. भारताप्रमाणेच बांगलादेशही श्रीलंकेचा दौरा करण्याबाबत अजून विचार करत आहे. बांगलादेश संघ जुलै-ऑगस्टमध्ये श्रीलंकेत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. श्रीलंकेला आधीच इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची घरच्या मैदानावर होणारी मालिका पुढे ढकलणे भाग पडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -