IPL Auction 2022 : यंदाच्या आयपीएलमध्ये कट्टर शत्रू एकाच संघात खेळताना दिसणार, चर्चेला उधाण

आयपीएलच्या लिलावाला आज बंगळुरूमध्ये सुरूवात झाली आहे. यामध्ये अनेक युवा खेळाडू मालामाल झाले आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंमधील कृणाल पांड्या आणि दीपक हुड्डा यांचा वाद चांगलाच गाजला होता. यावेळी लखनौ सुपर जायंट्सने दीपक हुड्डा आणि अष्टपैलू खेळाडू क्रृणाल पांड्यालाही विकत घेतलं आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू पुन्हा एकदा एकाच संघात खेळताना दिसणार आहेत. दीपक हुड्डाला लखनौच्या टीमने ५.७५ कोटी रूपयांना विकत घेतलं आहे. तर क्रृणाल पांड्याला ८.२५ कोटी रूपयांना विकत घेतले आहे.

क्रृणाल पांड्यासाठी गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स आणि हैदराबाद यांच्यामध्ये चढाओढ सुरू होती. मात्र, लखनौ संघाने क्रृणालला ८.२५ कोटी रूपयांना विकत घेतलं. दरम्यान, मागील वर्षातील जानेवारी महिन्यात खेळण्यात आलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये बडोद्याच्या पहिल्या सामन्याआधी या दोघांमध्ये वाद रंगला होता.

काय आहे वाद?

सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये दीपक हुड्डा आणि क्रृणाल पांड्या यांच्यामध्ये वाद झाला होता. हुड्डाने बडोदा क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहून क्रृणाल पांड्याची तक्रार केली होती. कृणाल पांड्यावर शिव्या दिल्याचे आणि करियर बरबाद केल्याचे आरोप केले. तसेच करियर संपवण्याच्या धमक्याही दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

हे खेळाडू ठरले अनसोल्ड –

मोहम्मद नबी, मॅथ्यू वेड, वृद्धीमान साहा, सुरेश रैना, स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल हसन आणि डेविड मिलर, सॅम बिलिंग्स, उमेश यादव, आदील रशीद, जीब जादरान, इमरान ताहीर, अॅडम झम्पा, आमित मिश्रा हे खळाडू पहिल्या दिवशी अनसोल्ड ठरले आहेत.


हेही वाचा : IPL Auction 2022: कोट्यावधीचा लिलाव ! आयपीएल लिलावात कोणावर लागली कोट्यावधींची बोली, जाणून घ्या