घरक्रीडादीपिका-रणवीरची क्रिकेट विश्वात एन्ट्री, खरेदी करणार IPL टीम

दीपिका-रणवीरची क्रिकेट विश्वात एन्ट्री, खरेदी करणार IPL टीम

Subscribe

बॉलीवूड गाजवल्यानंतर दीपिका-रणवीर आता क्रिकेटमध्ये आपलं नशीब आजमावणार आहेत. लवकरच IPL मध्ये दोन नवीन टीम दिसणार असून दिपिका रणवीर त्यासाठी बोली लावणार आहेत. शाहरुख खान आणि प्रिती झिंटाचीही टीम यात असणार आहे. टीमची बोली २५ ऑक्टोबरपासून लागणार असून सर्वाधिक बोली लावणाऱ्या दोन टीमला त्याचे अधिकार मिळणार आहेत.

शाहरुख खान आणि जुही चावलाच्या टीमचे नाव कोलकाता नाईट रायडर्स आहे. तर प्रीति झिंटाची स्वत:ची किंग्ज ११ ही टीम आहे. दीपिका आणि रणवीरचीही अशीच टीम असेल अशी सध्या चर्चा आहे. दोघेजण क्रिकेटचे शौकिन आहेत. दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण हे बॅडमिंटन चँमिपियन होते. तर रणवीर सिंग यानेही दोन स्पोर्टींग टुर्नामेंटस खेळल्या आहेत. यात एनबीए आणि इंग्लीश प्रिमियर लीगचा समावेश आहे.

- Advertisement -

दरम्यान, दीपिका आणि रणवीरच नाही तर या दोन नव्या टीमसाठी अनेकजण बोली लावणार आहेत. यात अदानी ग्रुप, ग्लेजर फॅमिली, ऑरोबिंदो फार्मा, टॉरेंट फार्मा, जिंदाल स्टील, हिन्दुस्तान टाइम्स मीडिया, रॉनी स्क्रूवाला, आरपी-संजीव गोयंका ग्रुप, कोटक ग्रुप, सिंगापुर बेस्ड पीई फर्म, सीवीसी पार्टनर्स आणि ब्रॉडकास्ट अँड स्पोर्टस कन्सलटींग एजेन्सी आईटीडब्ल्यू आणि ग्रुप एमचाही समावेश आहे.

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -