घरIPL 2020IPL 2020 : दिल्लीची कोहलीच्या आरसीबीवर मात; अव्वल स्थानी झेप

IPL 2020 : दिल्लीची कोहलीच्या आरसीबीवर मात; अव्वल स्थानी झेप

Subscribe

या विजयासह दिल्लीने गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली.

मार्कस स्टोइनिसची फटकेबाजी आणि कागिसो रबाडाच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर ५९ धावांनी मात केली. दिल्ली कॅपिटल्स संघाला यंदाची आयपीएल स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्यांनी या स्पर्धेची दमदार सुरुवात करताना पाच पैकी चार सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांनी ८ गुणांसह आयपीएलच्या गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली आहे. या सामन्यात दिल्लीने ४ बाद १९६ अशी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना आरसीबीला ९ बाद १३७ धावाच करता आल्या.

मार्कस स्टोइनिसची फटकेबाजी

या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी दिल्लीच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. या दोघांनी अवघ्या ६.४ षटकांत ६८ धावांची सलामी दिल्यावर शॉला (४२) मोहम्मद सिराजने बाद केले. यानंतर धवन (३२) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (११) हेसुद्धा झटपट माघारी परतले. रिषभ पंत आणि मार्कस स्टोइनिस यांनी मात्र दिल्लीचा डाव सावरला. पंतने २५ चेंडूत ३७, तर स्टोइनिसने २६ चेंडूत नाबाद ५३ धावांची खेळी केली. त्यामुळे दिल्लीने २० षटकांत ४ बाद १९६ अशी धावसंख्या उभारली.

- Advertisement -

कोहलीची एकाकी झुंज

१९७ धावांचा पाठलाग करताना आरसीबीला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती. मात्र, फॉर्मात असलेल्या देवदत्त पडिक्कलला अवघ्या ४ धावांवर रविचंद्रन अश्विनने बाद केले. फिंच (१३), एबी डिव्हिलियर्स (९) या प्रमुख फलंदाजांनाही फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. एका बाजूला विकेट पडत असताना कर्णधार कोहलीने एकाकी झुंज देत ३९ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. मात्र, त्याला कागिसो रबाडाने बाद करत आरसीबीला आणखी अडचणीत टाकले. यानंतरच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. त्यामुळे आरसीबीला २० षटकांत ९ बाद १३७ धावाच करता आल्या. दिल्लीच्या रबाडाने ४ विकेट घेतल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -