घरक्रीडाDenmark Open : उपांत्य फेरीत श्रीकांत पराभूत

Denmark Open : उपांत्य फेरीत श्रीकांत पराभूत

Subscribe

किदाम्बी श्रीकांतला डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

किदाम्बी श्रीकांतचा डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जपानच्या केंटो मोमोटाने पराभव केला. श्रीकांतला जपानच्या केंटो मोमोटाने १६-२१, १२-२१ असे पराभूत केले. त्यामुळे त्याचे ही स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. मोमोटासमोर श्रीकांतचा नववा पराभव होता. तर श्रीकांतला मोमोटावर फक्त ३ विजय मिळवण्यात यश आले आहे.

असा झाला सामना  

उपांत्य फेरीत किदाम्बी श्रीकांतला जपानच्या केंटो मोमोटाने १६-२१, १२-२१ असे पराभूत केले. या सामन्यातील पहिल्या सेटच्या मध्यंतराला मोमोटाकडे ११-१० अशी अवघ्या एका गुणाची आघाडी होती. यानंतर मोमोटाने आपली आघाडी १५-११ अशी वाढवली. अखेर मोमोटाने हा सेट २१-१६ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मोमोटाने चांगली सुरुवात केली. या सेटच्या मध्यंतरापर्यंत त्याच्याकडे ११-७ अशी आघाडी होती. मध्यंतरानंतर मोमोटाने अधिक आक्रमण करत १९-१२ अशी मोठी आघाडी मिळवली. त्याने पुढील दोन्ही गुण मिळवत हा सेट २१-१२ असा जिंकला. त्यामुळे त्याने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

- Advertisement -


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -