Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा Denmark Open : सायना अंतिम फेरीत

Denmark Open : सायना अंतिम फेरीत

Subscribe

सायना नेहवालने इंडोनेशियाच्या ग्रीगोरिया मारिस्का तुंजंगचा पराभव करत डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिने उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या ग्रीगोरिया मारिस्का तुंजंग हिचा पराभव केला. सायनाने उपांत्य फेरीत ग्रीगोरियाचा २१-११, २१-१२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

असा झाला सामना

सायनाने उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या ग्रीगोरिया मारिस्का तुंजंगचा २१-११, २१-१२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या सामन्यात पहिल्या सेटच्या सुरुवातीलाच तिने ४-१ अशी आघाडी मिळवली. या सेटच्या मध्यंतरापर्यंत तिच्याकडे ११-५ अशी आघाडी होती. यानंतरही तिने आपला चांगला खेळ सुरू ठेवत हा सेट २१-११ असा जिंकला. दुसऱ्या सेटच्या सुरूवातीला ग्रीगोरियाने सायनाला चांगला लढा दिल्यामुळे दोघींमध्ये ७-७ अशी बरोबरी होती. पण यानंतर सायनाने अधिक आक्रमण करत मध्यंतरापर्यंत ११-८ अशी आघाडी मिळवली. मध्यंतरानंतर सायनाने ग्रीगोरियाला सामन्यात पुनरागमनाची संधी दिली नाही. तिने हा सेट २१-१२ असा जिंकत सामनाही जिंकला. त्यामुळे तिने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत तिचा सामना चीन ताईपेच्या ताई झू यिंग हिच्याशी होईल. सायनाने याआधी २०१२ मध्ये डेन्मार्क ओपेनचे जेतेपद पटकावले होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -