घरक्रीडादेवधर चषक : भारत 'ब' ची विजयी सुरूवात

देवधर चषक : भारत ‘ब’ ची विजयी सुरूवात

Subscribe

देवधर चषकाच्या सलामीच्या सामन्यात भारत 'ब' ने भारत 'अ' वर ४३ धावांनी विजय मिळवला.   

फलंदाज हनुमा विहारी आणि फिरकी गोलंदाज मयांक मार्कंडे, शहाबाज नदीम यांनी केलेल्या अप्रतिम प्रदर्शनाच्या जोरावर देवधर चषकाच्या सलामीच्या सामन्यात भारत ‘ब’ ने भारत ‘अ’ वर ४३ धावांनी विजय मिळवला.

विहिरीच्या ९५ चेंडूंत नाबाद ८७ धावा

या सामन्यात भारत ‘ब’ चा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला मोहम्मद सिराजने अवघ्या २ धावांवर बाद केले. यानंतर मयांक अगरवाल आणि श्रेयस अय्यरने चांगली फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. ४६ धावा करून अगरवाल बाद झाला. तर अश्विनने अय्यरला ४१ धावांवर माघारी परतवले. त्यामुळे १८ षटकांनंतर भारत ‘ब’ची अवस्था ३ बाद ९५ अशी होती. यानंतर हनुमा विहारी आणि मनोज तिवारीने चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. ५२ धावा करून तिवारी धावचीत झाला. पुढे विहारीने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत भारत ‘ब’चा स्कोर २६१ पर्यंत नेला. विहारीने ९५ चेंडूंत नाबाद ८७ धावा केल्या. भारत ‘अ’ कडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक २ विकेट घेतल्या.

मार्कंडेने ४, नदीमने ३ गडी केले बाद

२६२ धावांचा पाठलाग करताना भारत ‘अ’ ची सुरुवात चांगली झाली नाही. तिसऱ्याच षटकात शहाबाज नदीमने पृथ्वी शॉ आणि करूण नायर यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद केले. अनमोलप्रीत सिंग, अंकित बावणे आणि कृणाल पांड्या हे फलंदाजीची खेळपट्टीवर फारकाळ टिकाव धरू शकले नाहीत. त्यामुळे भारत ‘अ’ ची अवस्था ५ बाद ८७ अशी होती. यानंतर कर्णधार दिनेश कार्तिक आणि रविचंद्रन अश्विन यांनी भारत ‘अ’ चा डाव सावरला. त्यांनी १२३ धावांची भागीदारी करत भारत ‘अ’ च्या जिंकण्याच्या आशा कायम ठेवल्या. अश्विनने ५४ धावा केल्यानंतर त्याला मयांक मार्कंडेने बाद केले. तर कार्तिक आपल्या शतकापासून केवळ एक धाव दूर असताना त्याला नदीमने बाद केले. हे दोघे बाद झाल्यानंतर तळाच्या फलंदाजांना चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे भारत ‘अ’ चा डाव २१८ धावांवर संपुष्टात आला. भारत ‘ब’ कडून मार्कंडेने सर्वाधिक ४ आणि नदीमने ३ गडी बाद केले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -