Homeक्रीडाBCCI Secretary : यांनी घेतली जय शहांची जागा; प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळले...

BCCI Secretary : यांनी घेतली जय शहांची जागा; प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळले फक्त 4 सामने अन्…

Subscribe

नवी दिल्ली : जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिवपदी कोण बसणार? याची अनेकांना उत्सुकता होती. अखेर आता या पदावर नेमणूक झाली असून आसामचे माजी क्रिकेटपटू देवजीत सैकिया यांनी बीसीसीआयच्या सचिवपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत (MGM) हा निर्णय घेण्यात आला असून जय शहांनंतर देवजीत सैकिया हेच अंतरिम सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत होते. (Devajit Saikia becomes new BCCI Secretary after Jay Shah)

हेही वाचा : ICC : आयसीसीच्या या कृतीमुळे गोलंदाजांना होईल फायदा; फलंदाजांची नाही चालणार मनमानी 

जय शहा यांनी 1 डिसेंबर 2024 मध्ये आयसीसीचे अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यानंतर बीसीसीआयचे अतिरिक्त सचिव म्हणून देवजीत सैकिया हे काम पाहत होते. बीसीसीआयच्या नियमांनुसार, कोणतेही रिक्त पद 45 दिवसांच्या आत विशेष सर्वसाधारण सभा बोलावून भरावे लागते. त्यानंतर बीसीसीआयने एक सर्वसाधारण बैठक बोलावली होती. सचिव म्हणून सैकिया बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्यासह आढावा बैठकीला उपस्थित होते. या आढावा बैठकीत भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा उपस्थित होते.

कोण आहेत देवजीत सैकिया ?

देवजीत सैकिया हे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आहेत. त्यांनी 1990 ते 1991 पर्यंत 4 सामने खेळले असून त्यांची कारकीर्द लहान राहिली आहे. यावेळी त्यांनी 53 धावा केल्या तर, यष्टीरक्षक म्हणून नऊ विकेट्स घेतल्या. क्रिकेटनंतर त्यांनी कायद्यामध्ये आपली कारकीर्द सुरू केली त्यानंतर वयाच्या 28 व्या वर्षी ते गुवाहाटी उच्च न्यायालयात वकील बनले. याचवेळी त्यांना स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि उत्तर रेल्वेमध्ये नोकरी मिळाली. 2016 पासून देवजीत सैकिया यांची क्रिकेट प्रशासनातील कारकीर्द सुरू झाली. यावेळी ते आसाम क्रिकेट असोसिएशनच्या (ACA) 6 उपाध्यक्षांपैकी एक बनले. यावेळी हिमंता बिस्वा सरमा हे अध्यक्ष होते. देवजीत सैकिया 2019 मध्ये ACA चे सचिव झाले आणि त्यानंतर 2022 मध्ये BCCI चे संयुक्त सचिव म्हणून त्यांची निवड करण्यात आली.