घरक्रीडाIND vs ENG : वनडे मालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 'या' फलंदाजाला संधी?

IND vs ENG : वनडे मालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ‘या’ फलंदाजाला संधी?

Subscribe

भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिकेचे सामने २३, २६ आणि २८ मार्चला खेळले जाणार आहेत. 

इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर असून या दोन संघांमध्ये सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका, तसेच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडणार आहे. भारताने टी-२० मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच संघाची घोषणा केली होती. परंतु, एकदिवसीय मालिकेसाठी अजून भारताचा संघ जाहीर झालेला नाही. या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा उपकर्णधार आणि अनुभवी सलामीवीर रोहित शर्माला विश्रांती मिळण्याची शक्यता असून त्याच्या जागी डावखुरा सलामीवीर देवदत्त पडिक्कलला संधी मिळू शकेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचे सामने २३, २६ आणि २८ मार्चला खेळले जाणार आहेत.

आरसीबीकडून सर्वाधिक धावा

देवदत्त पडिक्कल सध्या चांगल्या फॉर्मात आहे. मागील आयपीएल मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळताना त्याने १५ सामन्यांत ४७३ धावा केल्या होत्या आणि आरसीबीकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो अव्वल स्थानावर होता. त्याने आपला चांगला फॉर्म सध्या सुरु असलेल्या विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत कायम ठेवला आहे. त्याने या स्पर्धेत कर्नाटकाकडून खेळताना आतापर्यंत ५ सामन्यांत ३ शतके आणि २ अर्धशतकांच्या मदतीने ५७२ धावा फटकावल्या आहेत. त्यामुळे आता त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

रोहितला मिळणार विश्रांती?

रोहितने मागील काही काळात बरेच सामने खेळले आहेत. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत अखेरचे दोन सामने खेळले होते. तो आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळत असून या मालिकेच्या तीन सामन्यांत त्याने भारताकडून सर्वाधिक २९६ धावा केल्या आहेत. आता तो आणखी एक कसोटी सामना आणि पाच टी-२० सामने खेळणार आहे. त्यामुळे एकदिवसीय मालिकेसाठी त्याला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -