घरक्रीडाNZ vs BAN,1st Test: डेव्हान कॉनवेनं झळकावलं शतक, सामन्याच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंडची...

NZ vs BAN,1st Test: डेव्हान कॉनवेनं झळकावलं शतक, सामन्याच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंडची दमदार सुरुवात

Subscribe

न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हान कॉनवेनं २०२२ वर्षातील पहिल्या कसोटी सामन्यात धमाकेदार सुरूवात केली आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी कॉनवेनं शतक झळकावून मोठा विक्रम नोंदवला आहे. डावखुऱ्या फलंदाजाचे हे कसोटी कारकीर्दितील दुसरेच शतक ठरले आहे. घरच्या मैदानावरील हे त्याचे पहिलेच शतक आहे. न्यूझीलंड विरूद्ध बांगलादेश यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात पाच विकेट्सवर २५८ धावा पूर्ण केल्या आहेत.

माउंट मौंगानुई येथे सुरू असलेल्या बांगलादेशविरूद्धच्या कसोटीत १८६ चेंडूत शतक पूर्ण केलं आहेत. कॉनवेनं ७ व्या कसोटी डाव्यात दोन शतक आणि दोन अर्धशतक झळकावले आहेत. त्यात त्याने २२७ चेंडूत १२२ धावा केल्या आहेत. यापैकी ७० धावा या केवळ चौकर-षटकारांनीच जोडल्या. कर्णधार टॉम लॅथमने १ धाव पूर्ण करत चौथ्याचं षट्कात माघारी परतल्यानंतर विल यंग आणि कॉनवे यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी मिळून १३८ धावांची भागिदारी केली आहे.

- Advertisement -

डेव्हान कॉनवेनं २०२१ मध्ये २९ वर्षाच्या वयातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केलं होतं. तसेच पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा शतक झळकावला होता. चार कसोटी सामन्यांपैकी दोन शतकं कॉनवेच्या नावावर आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या अर्धशतकामुळे ८३ च्या सरासरीत ५०१ धावा पूर्ण केल्या आहेत. वनडे सामन्यात ७५ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ५० च्या सरासरीत धावा बनवल्या आहेत.


हेही वाचा : Virat Kohli vs BCCI: हे तर आगीत तेल ओतण्याचं काम, कोहली-बीसीसीआय वादावर माजी क्रिकेटपटूची प्रतिक्रिया

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -