Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा NZ vs AUS T20 : न्यूझीलंडने उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा; कॉन्वे ठरला मॅचविनर 

NZ vs AUS T20 : न्यूझीलंडने उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा; कॉन्वे ठरला मॅचविनर 

कॉन्वेने ५९ चेंडूत नाबाद ९९ धावांची खेळी केली.

Related Story

- Advertisement -

डेवॉन कॉन्वेच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ५३ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह न्यूझीलंडने पाच सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ख्राईस्टचर्च येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने २० षटकांत ५ बाद १८४ अशी धावसंख्या उभारली. १८५ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अडखळती सुरुवात झाली. मिचेल मार्शने एकाकी झुंज देत ४५ धावांची खेळी केली. परंतु, त्याला इतरांची साथ न लाभल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव १८ व्या षटकात १३१ धावांवर आटोपला. न्यूझीलंडचा लेगस्पिनर ईश सोधीने २८ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट घेतल्या. त्यामुळे न्यूझीलंडने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला.

कॉन्वेला फिलिप्सची साथ

त्याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडने सुरुवातीच्या तीन विकेट १९ धावांतच गमावल्या. मात्र, कॉन्वे आणि ग्लेन फिलिप्स यांनी ७४ धावांची भागीदारी रचत न्यूझीलंडचा डाव सावरला. फिलिप्स २० चेंडूत ३ षटकारांच्या मदतीने ३० धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यावर कॉन्वेला जिमी निशमची (२६) उत्तम साथ लाभली.

शतक एका धावेने हुकले

- Advertisement -

कॉन्वेने उत्कृष्ट फलंदाजी केली, पण त्याचे शतक एका धावेने हुकले. त्याने ५९ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ९९ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे न्यूझीलंडने २० षटकांत ५ बाद १८४ अशी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव १३१ धावांत आटोपला आणि न्यूझीलंडने हा सामना ५३ धावांनी जिंकला.

- Advertisement -