कुस्तीपटू गीता फोगट झाली आई; दिला गोंडस बाळाला जन्म!

कुस्तीपटू गीता फोगटने मंगळवारी गोंडस बाळाला जन्म दिला. गीताने तीच्या सारख्याच एका धाकड मुलाला जन्म दिला आहे. गीताने आपले पती आणि गोंडस बाळाबरोबरचा फोटो सोशलमिडीयावर शेअर करत ही आनंदाची बातमी सगळ्यांना दिली आहे.

गीताने बाळाचा फोटो शेअर करतना सुंदर कॅप्शनही दिलं आहे. ‘बाळा तुझं या जगात स्वागत आहे. आम्ही किती प्रेमात आहोत. कृपया याला तुमचं प्रेम आणि आशिर्वाद द्या. त्याच्या येण्यानं आमचं आयुष्य परिपुर्ण झालं आहे. आपल्या मुलाला जन्म देताना पाहण्याचा अनुभव शब्दात वर्णन करण्यापलिकडचा आहे. हे कॅप्शन देत गीताने बाळाचा फोटो सोशलमिडीयावर शेअर केला आहे.

गीता- बबीता ही बहिणींचा जोडी सगळ्यांनाच माहिती आहे. अमिर खानच्या दंगल या चित्रपटामुळे ही बहिणींची जोडी पुन्हा चर्चेत आली. बबिता फोगट हिनेही आपल्या भाच्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आई झाल्याबद्दल तुझं अभिनंदन. मी आशा करते बाळाला आनंद, प्रेम आणि हास्याने परिपूर्ण दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला प्रेम, यश आणि आनंद मिळो. तू आपली परंपरा बाळामध्ये उतरवली आहेस’ असं बबिताने ट्विटरवर लिहिलं आहे.

गीता फोगटने २० नोव्हेंबर २०१६ रोजी कुस्तीपटू पवन कुमारशी लग्न केलं. २०१०मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी गीता फोगाट ही भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली होती.