जाहिरातींचे नियम मोडणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये धोनी, भुवन बाम अव्वल, ASCIकडून यादी जाहीर

बॉलिवूडसह अनेक बड्या सेलिब्रिटींकडून विविध प्रकारच्या जाहिराती केल्या जातात. परंतु काही बड्या सेलिब्रिटींकडून जाहिरातीसंदर्भातील नियमांचं उल्लंघन केल्याची माहिती समोर आली आहे. या सेलिब्रिटींमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू एमएस धोनी हा पहिल्या क्रमांकावर आहे. तर युट्यूबर भुवन बामचा दुसरा क्रमांक आहे.

ASCI ने 2022-23 साठी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये त्यांनी 7 हजार 928 जाहिरातींचे विश्लेषण केले आहे. या अहवालात अशा अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत, ज्यांनी इन्फ्लुअन्सर म्हणून एएससीआयच्या नियमांचे उल्लंघन केले. तसेच जाहिरातीपूर्वी या सेलिब्रिटींनी त्यांच्या वतीने कंपनी किंवा उत्पादनाची सखोल चौकशी केली नसल्याचा देखील आरोप आहे.

FY23 मध्ये सेलिब्रिटींविरुद्धच्या तक्रारींमध्ये 803 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच इंस्टाग्रामवरही जाहिरात नियमांचे सर्वाधिक उल्लंघन होते. त्याचे प्रमाण 33 टक्के इतके आहे. 31 टक्के नियम मोडणाऱ्या जाहिराती फेसबुकच्या होत्या. तर 22 टक्के वेबसाइट, 12 टक्के यूट्यूब आणि 2 टक्के इतर स्त्रोतांकडून दाखवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पर्सनल केअरच्या सर्वाधिक 35.56 टक्के जाहिरातींनी नियमांचे उल्लंघन केले आहे.

या यादीत कोणाचा समावेश आहे?

या यादित पहिलं नाव महेंद्रसिंग धोनीचं येतं. त्यानंतर भुवन बाम, जिम सरभ, विराट कोहली, विशाल मल्होत्रा, श्रद्धा कपूर, रणवीर सिंग, सारा अली खान, राहुल देव, क्रिती सेनन, मनोज तिवारी, काजल अग्रवाल यांसारख्या बड्या हस्तींच्या नावांचाही यात समावेश आहे.


हेही वाचा : सौरव गांगुलीला दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक बनवा, इरफान पठाणचा सल्ला