धोनीचे बदलते अवतार

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या करिअरमध्ये उतार-चढाव येत गेले आणि त्यानुसार त्याच्या हेअरस्टाइल्सही बदलत गेल्या. याच सर्व लुक्सचा हा एक आढावा...

dhoni looks
महेंद्रसिंग धोनी

भारताचा माजी कर्णधार आणि ‘कॅप्टन कुल’ म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी आपल्या स्टाइल आणि लुक्सवर जास्त लक्ष देत नसला तरी तो आपल्या आतपर्यंतच्या वेगवेगळ्या हेअरस्टाइलमुळे फेमस आहे. जवळपास १४ वर्षापासून आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या धोनी आता ३७ वर्षांचा झाला असला तरी त्याचा चाहतावर्ग आजही त्याच्यासाठी आणि त्याच्या लुक्ससाठी वेडा असल्याचे वेगवेगळ्या प्रसंगातून आपल्याला दिसून येते.

१. लाँग हेअर

धोनीने जेव्हा २००५ दरम्यान आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा तो आपल्या लाँग हेअर्ससाठी फेमस होता, त्याच्या त्या डॅशिंग हेअरच्या लुकने तो मैदानावर बॉलर्सची चांगलीच धुलाई करायचा. विशेष म्हणजे त्याचा हा लुक इतका लोकप्रिय होताकी खुद्द पाकिस्तानचे त्यावेळीचे राष्ट्रपती परवेझ मुशरफ यांनीही धोनीला केस कापू नको असा सल्ला दिला होता.

dhoni long hair
धोनीचे लांब केस

२. सिल्की हेअर

२००६ दरम्यान जेव्हा धोनी हळूहळू एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपली एक भक्कम जागा तयार करत होता तेव्हा त्याने आपले केस लांबच ठेवले होते मात्र त्यांना सिल्की लुक दिला होता. त्याने याच लुकमध्ये भारताला २००७ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकवून दिला होता.

2007 wc dhoni
धोनी सिल्की हेअर स्टाइल

३. बाल्ड हेअर

भारताला २०११ मध्ये विश्वचषक जिंकून दिल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी धोनीने चक्क टक्कल केले. त्याने आपले केस धार्मिक कारणामुळे कापले असल्याचे जाहीर करत जगासमोर आपला एक नवा लुक आणला.

bald hair
२०११ विश्वचषक जिंकल्यानंतरचा धोनीचा लुक

४. मोहॉक लुक 

भारताला २०११ चा विश्वचषक जिंकून दिल्यानंतर धोनीने पुन्हा आपले केस पहिल्यासारखे वाढवले नाहीत. मात्र २०१३ च्या आयपीएल दरम्यान धोनीचा मोहॉक लुकचे केस बरेच फेमस झाले होते. हे केस त्याला एक लढवय्या लुक देत होते.

mohawyk look
धोनीचा मोहॉक लुक

५. ओल्ड लुक

धोनीने २०१४ मध्ये जेव्हा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा त्याने आपले केस विखुरलेले आणि पिकलेले ठेवले होते. त्याच्या या केसांमुळे तो बराच चर्चेत आला होता.

old look
धोनीचा ओल्ड लुक

६. शॉर्ट हेअर

जानेवारी २०१७ मध्ये कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर धोनी आपल्या साध्या आणि नीटनेटक्या केसात दिसून येऊ लागला. सध्या तो भारतीय संघांतील एक सर्वात अनुभवी क्रिकेटर असल्याने तो छोटे आणि नीटनेटके केस ठेवत आपला साधेपणा जपतो.

dhoni retire
धोनीचा शॉर्ट हेअर नॉर्मल लुक

७. लेटेस्ट लुक

धोनी नुकताच आपल्या रिटायरमेंटच्या अफवेमुळे चर्चेत राहिला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत तिसरा आणि निर्णायक सामना पराभूत झाल्यामुळे भारताला ही मालिका गमवावी लागली मात्र विशेष म्हणजे सामन्यानंतर दरवेळी स्टंप नेणाऱ्या धोनीने यावेळी बॉल नेल्याने त्याच्या निवृत्तीची चर्चा सर्वत्र झाली. मात्र रवी शास्त्रींच्या खुलाशानंतर या चर्चेला फुलस्टॉप लागला. या सर्व मॅचदरम्यान धोनीने आपल्या केसांसहीतच आपले दाढीचे केसही पिकवले आहेत.

dhoni latest
धोनीचा सध्याचा लेटेस्ट लुक

धोनी आपल्या खेळासोबतच आपल्या या सर्व लुक्ससाठीही चांगलाच प्रसिद्ध झाला पुढच्या काळाच धोनी आपल्या लुकमध्ये आणि खेळात काय बदल करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.