घरक्रीडाIPL 2021: धोनीच्या फॉर्मवर CSK चे कोच म्हणतात...

IPL 2021: धोनीच्या फॉर्मवर CSK चे कोच म्हणतात…

Subscribe

चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) चे मुख्य प्रशिक्षक स्टेफेन फ्लेमिंग यांनी सीएसकेच्या दिल्ली विरूध्दच्या सामन्यात मिळालेल्या पराभवावर भाष्य केले आहे. चेन्नईच्या कर्णधारालाच नाही, तर दोन्ही संघातील खेळाडूंना मोठी धावसंख्या करण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. धोनीच्या सध्याच्या फॉर्मवर एकप्रकारे पाठराखण करत त्यांनी धोनीचे समर्थन केले आहे. CSK चा कर्णधार धोनी एकटाच फलंदाज नव्हता ज्याने संघर्ष केला, तर सामन्याच्या शेवटी दोन्ही संघातील खेळाडूंनी संघर्ष केला, असे फ्लेमिंग यांनी सांगितले असून जेव्हा प्रतिस्पर्धी संघाला १३७ धावा काढणे देखील आव्हानात्मक वाटत होते, त्यांना देखील मोठे शॉट्स मारणे कठीण होत होते, सोमवारच्या सामन्यात दोन्ही संघानी संघर्ष केल्याचा पहायला मिळाला आहे. अशा प्रकारे फ्लेमिंग यांनी संघाची पाठराखण केली. (Dhoni is not only player who is struggling to score runs Stephen Fleming backs MSD)

अनेक दिग्गज माजी क्रिकेटपटूंनीही या पिचवर खेळणे हे अत्यंत कठीण होते, असे म्हटले आहे. मोठी धावसंख्या करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागल्याचेही मत अनेकांनी व्यक्त केले आहे. सोमवारच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जला २० षटकांत ५ बळी घेत १३६ धावांवर रोखले होते आणि दिल्ली कॅपिटल्सने २ चेंडू राखून सामन्यावर विजय प्राप्त केला होता.

- Advertisement -

सध्या तर अडचण ही आहे की, तीन वेगवेगळ्या मैदानावरील वातावरण आणि प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारण्याचे आव्हान होते. इथे अपेक्षांची कमी नाही आणि आम्ही काही चुका देखील केल्या. दिल्लीच्या बॉलर्सनी शेवटच्या ५ षटकांत आक्रमण अशी खेळी केली. फ्लेमिंग यांनी सांगितले की, टूर्नामेंटच्या शेवटच्या टप्प्यात येऊन सलग २ पराभव होणे संघासाठी धोकादायक आहे. गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चेन्नईचा शेवटचा सामना ७ ऑक्टोबरला किंग्ज पंजाब विरूध्द आहे.


हेही वाचा – सुनील गावस्कर यांच्या नावे वानखेडे स्टेडिअमचा ‘हॉस्पिटॅलिटी बॉक्स’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -