घरक्रीडामाझी धोनीसोबत तुलना नकोच, त्याच्यासारखा खेळाडू होणे नाही - रोहित 

माझी धोनीसोबत तुलना नकोच, त्याच्यासारखा खेळाडू होणे नाही – रोहित 

Subscribe

धोनी आणि रोहितमध्ये साम्य आहे, असे काही दिवसांपूर्वी सुरेश रैना म्हणाला होता.

महेंद्रसिंग धोनी आणि माझी तुलनाच होऊ शकत नाही, असे विधान भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने केले. धोनी हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याच्या नेतृत्वात भारताने २००७ टी-२० आणि २०११ एकदिवसीय असे दोन विश्वचषक जिंकले. तसेच धोनी कर्णधार असताना भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धाही जिंकली होती. आयसीसीच्या या तिन्ही स्पर्धा जिंकणारा धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे. तसेच कितीही दबावात शांत राहून योग्य तो निर्णय घेण्यात धोनी पटाईत आहे. याबाबतीत त्याच्यात आणि रोहितमध्ये साम्य आहे, असे काही दिवसांपूर्वी सुरेश रैना म्हणाला होता. मात्र, रोहितला ही तुलना मान्य नाही.

तुलना करणे मला पटत नाही

रैना माझ्याबाबत काय बोलला हे मी ऐकले आहे. मी त्याच्या मताचा आदर करतो. मात्र, धोनीसारखा दुसरा खेळाडू होणे नाही. त्याच्यासारखा खेळाडू पुन्हा घडणार नाही. दोन खेळाडूंमध्ये तुलना होऊ नये या मताचा मी आहे. प्रत्येक खेळाडूमध्ये काही गुण असतात आणि काही त्रुटी असतात. दुसऱ्या खेळाडूमध्ये त्या असतीलच असे नाही. त्यामुळे दोन खेळाडूंची तुलना करणे मला पटत नाही, असे रोहितने नमूद केले.

- Advertisement -

रैना काय म्हणाला?

मागील आठवड्यातच रैनाने कर्णधार म्हणून रोहितची स्तुती केली होती. रोहित हा भारतीय क्रिकेट संघासाठी पुढचा धोनीच आहे. तो अप्रतिम कर्णधार आहे. तो खूप शांत आणि संयमी आहे. इतरांचे सल्ले ऐकतो. धोनीनंतर रोहितच सर्वोत्तम कर्णधार आहे असे मी म्हणीन. रोहितने तर आयपीएल स्पर्धा धोनीपेक्षाही जास्त वेळा जिंकली आहे. या दोघांमध्ये बरेच साम्य आहे, असे रैना म्हणाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -