घरक्रीडाधोनीने स्टेडियममधील खुर्च्यांना केले पॉलिश, व्हिडीओ झाला व्हायरल

धोनीने स्टेडियममधील खुर्च्यांना केले पॉलिश, व्हिडीओ झाला व्हायरल

Subscribe

चेन्नई : येत्या 31 मार्चपासून आयपीएल 2023 ला सुरुवात होणार आहे आणि पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघ सरावासाठी चेपॉक स्टेडियमवर पोहोचला आहे. चेन्नईच्या फ्रँचायझीने कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा संघासोबत सराव आणि मजा करतानाचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये धोनी चेपॉक स्टेडियममधील खुर्च्यांना पॉलिश करताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएलचा सराव करण्यासाठी ३ मार्च पासूनच चेपॉकच्या स्टेडियमवर सुरूवात केली होती.

चेन्नईच्या फ्रँचायझीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये धोनी खुर्च्यांना पॉलिश करताना दिसत आहे. धोनीच्या हातात टॉर्च पॉलिश दिसत दिसत आहे. तो व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीला बोलतो की, खरोखरच खुर्च्यांना रंग येत आहे. याआधी चेन्नईने धोनीच्या नेट्सचा व्हिडीओ शेअर केला होता. याशिवाय चेन्नई संघाचा प्रवास आणि ड्वेन ब्राव्होला शिट्टी वाजवतानाचा व्हिडीओही चेन्नई फ्रँचायझीकडून शेअर करण्यात आला आहे.

- Advertisement -

धोनीची शेवटची आयपीएल असण्याची शक्यता!
भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल असण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात धोनीने रवींद्र जडेजाकडे चेन्नईचे कर्णधारपद दिले होते, चेन्नई संघाच्या खराब प्रदर्शनानंतर धोनी पुन्हा चेन्नई संघाच्या कर्णधारपदी विराजमान झाला. त्याला गेल्या हंगामातील एका सामन्यादरम्यान विचारण्यात आले की तो निवृत्त होणार आहे का? धोनीने यावर प्रतिक्रिया देताना सांगितले होते की, तो मी देशांतर्गत चाहत्यांसमोर निवृत्ती घेईन. यावेळी चेन्नई सुपर किंग्ज 14 मे रोजी त्यांच्या घरच्या मैदानावर लीग टप्प्यातील शेवटचा सामना खेळणार आहे.
चेन्नई संघाने 7 मे 2019 रोजी घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळला होता. त्यामुळे धोनी यावेळच्या शेवटच्या आयपीएल सामन्यानंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत असली तरी याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 15 ऑगस्ट 2020 रोजी निवृत्ती जाहीर केली होती. 2019 मध्ये धोनीने एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -