घरक्रीडाIPL 2022 : माझ्या शेवटच्या मॅचला येणार ? धोनीने सांगितले फेअरवेलचे ठिकाण

IPL 2022 : माझ्या शेवटच्या मॅचला येणार ? धोनीने सांगितले फेअरवेलचे ठिकाण

Subscribe

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एम.एस.धोनीने आयपीएलच्या शेवटच्या सामन्याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. आगामी वर्षभर तरी तो पिवळ्या जर्सीमध्ये खेळणार असल्याचे त्याने सांगितले आहे. धोनीचे समर्थक ” प्रिय चेपक” मैदानात त्याला शेवटचा सामना खेळताना पाहू शकतात. धोनीच्या राजीनाम्याबाबत मागील काही दिवसांपासून क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू आहेत. त्यावर मंगळवारी धोनीने स्पष्टीकरण दिले आहे ” आयपीएलच्या येणाऱ्या हंगामी वर्षात देखील मी खेळणार आहे, आयपीएलच्या पुढील हंगामात संघामध्ये मोठा बदल होणार असल्याचे देखील त्याने सांगितले. (Dhoni shared farewell match venue for fans gave invitation for ipl 2022)

राजीनाम्याचाच विषय असेल असेल तर तुम्ही सगळे या सामन्याला येऊ शकता. मला सीएसकेसाठी शेवटचे खेळताना प्रत्यक्षात बघू शकता. हा सामना माझ्यासाठी शेवटचा असू शकतो. तुम्हाला देखील मला क्रिकेटच्या दुनियेतून निरोप द्यायची संधी मिळेल, मला आशा आहे की, आपण तो सामना चेन्नई मध्येच खेळू तिथे मला माझ्या समर्थकांशी देखील भेटता येईल.

- Advertisement -

सूत्रांच्या माहितीनुसार सीएसकेची फ्रॅंचायसी आगामी हंगामातील लिलाव प्रक्रियेत संघातील कर्णधार धोनी, रवींद्र जडेजा आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाड या तिन्ही खेळाडूंना संघात रिटेन करणार आहे. धोनीने सांगितले की राजीनाम्यानंतर मी बॉलीवुड किंवा कोणत्याही अभिनय क्षेत्राकडे मी जाणार नाही. अभिनयाचा पेशा हा खूप कठीण असल्याचे त्याने सांगितले. अभिनय करणे अतिशय अवघड आहे. मी जाहीरात क्षेत्रातच खुष असल्याचे धोनीने सांगितले.

आयपीएल २०२१ च्या हंगामात धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने जोरदार प्रदर्शन करत वापसी केली. या हंगामात १६ अंक मिळवून प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ सीएसके ठरला आहे. त्याच्या कर्णधारपदाच्या जोरावर संघाने आतापर्यंत १३ सामने खेळले आणि ९ सांमन्यात विजय प्राप्त केला आहे, तर ४ सामन्यांत पराभव स्विकारावा लागला आहे. धोनीचा संघ ज्या पध्दतीने खेळत आहे, त्या लयातच खेळत राहिला तर यंदाचा आयपीएल किताब देखील आपल्या नावे करण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2021 : मुंबईला प्ले-ऑफ प्रवेशासाठीचे काय आहेत पर्याय ?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -