घरक्रीडाधोनीची दुखापत गंभीर नाही - रैना

धोनीची दुखापत गंभीर नाही – रैना

Subscribe

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पाठीच्या दुखण्यामुळे सनरायजर्स हैद्राबादविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले होते. ही २०१० नंतर पहिली वेळ होती जेव्हा आयपीएलमध्ये चेन्नईचा संघ धोनीच्या नेतृत्त्वात खेळत नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्त्व करणार्‍या सुरेश रैनाने धोनीची दुखापत गंभीर नसल्याची माहिती दिली. धोनीला ही दुखापत रविवारी झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात झाली होती. हैद्राबादविरुद्धच्या सामन्यानंतर धोनीविषयी रैनाने सांगितले, धोनी हळूहळू सावरतो आहे. त्याच्या पाठीला दुखापत झाली आहे, पण ती फारशी गंभीर नाही. तो पुढील सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.

चेन्नईने हैद्राबादविरुद्धचा सामना गमावला. या सामन्यात चेन्नईला प्रथम फलंदाजी करताना १३२ धावाच करता आल्या, तर हैद्राबादने हे लक्ष्य १९ चेंडू राखूनच गाठले. आम्ही या सामन्यात चांगली फलंदाजी केली नाही, असे रैना म्हणाला. आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. ठराविक अंतराने आमच्या विकेट पडत राहिल्यामुळे आम्हाला चांगली धावसंख्या करता आली नाही. फलंदाजांनी एक-एक धाव करत चांगली भागीदारी करायला पाहिजे होती. आम्हाला या सामन्यात ३० धावा कमी पडल्या, असे रैनाने स्पष्ट केले.

- Advertisement -

पराभवाचा फार विचार नाही – फ्लेमिंग

बर्‍याच काळानंतर आम्ही अशा पद्धतीने पराभूत झालो. आता आमचे खेळाडू यातून कसे सावरतात आणि पुढील सामन्यात कसा खेळ करतात हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. आम्ही पराभवांबाबत फार विचार करत नाही. आम्ही सामन्यात काय चुका केल्या याचा शोध घेतो आणि पुढील सामन्यात त्या चुका पुन्हा न करण्याचा प्रयत्न करतो, असे हैद्राबादविरुद्धच्या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -