घरक्रीडाICC T20I WORLD CUP 2021 : धोनीचं भारतीय संघात पुनरागमन, मार्गदर्शकाच्या भुमिकेत

ICC T20I WORLD CUP 2021 : धोनीचं भारतीय संघात पुनरागमन, मार्गदर्शकाच्या भुमिकेत

Subscribe

शेवटी ज्या क्षणाची भारतीय क्रिकेटप्रेमी वाट पाहत होते तो क्षण आला, BCCI ने आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली. बुधवारी निवडकर्त्यांच्या दीर्घ बैठकीनंतर १५ सदस्यीय भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील या भारतीय संघासोबत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही मेंटर (मार्गदर्शक) म्हणून सामील होईल.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची गणना जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी टी -२० वर्ल्ड कपचे पहिले जेतेपद पटकावण्यात यशस्वी झाला. विश्वचषक, क्रिकेटचे सर्वात लहान स्वरूप, २००७ साली सुरू झाले, तेव्हा तरुणांनी सजलेल्या भारतीय संघाने ट्रॉफी जिंकून इतिहास रचला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ चा टी -२० विश्वचषक जिंकला होता. ४० वर्षीय धोनीने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटरमधून निवृत्ती घेतली होती. २०१९ च्या विश्वचषक सेमीफायनलमध्ये त्याने भारतासाठी शेवटचा सामना खेळला. असे मानले जाते की मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी रणनीती आखण्याचा त्याचा अनुभव पाहता त्याची या भूमिकेसाठी निवड झाली आहे. त्याला महत्त्वाची आयसीसी स्पर्धा कशी जिंकता येईल हे माहित आहे. कोहलीला आयसीसी स्पर्धांचा फारसा अनुभवी नाही यासाठीच महेंद्रसिंग धोनीही मेंटर (मार्गदर्शक) म्हणून सामील.

- Advertisement -

धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक, भारताने त्याच्या कर्णधार पदाखाली दोन विश्वचषक जेतेपदं जिंकली आहेत. २००७ दक्षिण आफ्रिकेत टी -२० विश्वचषक आणि भारतात २०११ एकदिवसीय विश्वचषक.

- Advertisement -

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी

राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर, दिपक चहर


हेही वाचा : ICC T20I WORLD CUP : टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -