रांची: भारताने रांची कसोटी जिंकली आहे. या कसोटीसह इंग्लंडविरुद्ध खेळवली जाणारी 5 सामन्यांची कसोटी मालिकाही टीम इंडियाच्या नावावर झाली आहे. या मालिकेतील केवळ चार सामन्यांनंतर टीम इंडियाने 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. (Dhruv Jurel History by Dhruv Jurel This happened for the first time in 22 years)
चौथ्या कसोटी सामन्यात ध्रुव जुरेल दोन्ही डावांत चमकला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. गेल्या 22 वर्षांत पदार्पणाच्या पहिल्याच कसोटी मालिकेत सामनावीर पुरस्कार जिंकणारा तो पहिलाच विकेटकीपर ठरला आहे. जुरेलच्या खेळीने भारताने चौथ्या कसोटीत पिछाडीवरू आघाडी घेतली.
रांची कसोटीत टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला ध्रुव जुरेल. ही कसोटी 5 विकेटने जिंकण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्याच्या दोन्ही डावात त्याने फलंदाजी करत अत्यंत महत्त्वाच्या धावा केल्या. या कसोटीत तो टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
पहिल्या डावात टीम इंडियाने 177 धावांवर 7 विकेट गमावल्या होत्या, तेव्हा ज्युरेलने खालच्या फळीतील फलंदाजांसह छोट्या आणि महत्त्वपूर्ण भागीदारी करत टीम इंडियाला 300 च्या पुढे नेले. ध्रुव जुरेलच्या खेळीमुळेच भारतीय संघ इंग्लंडला आव्हान देण्याच्या स्थितीत होता. भारताच्या पहिल्या डावात जुरेलने 149 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह 90 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या डावात अवघ्या 120 धावांत 5 विकेट्स गमावून भारतीय संघ बॅकफूटवर असताना शुबमन गिलच्या साथीने ज्युरेलने भारताला विजयाकडे नेले. जुरेलने दुसऱ्या डावात नाबाद 39 धावा केल्या.
भारताने पिछाडीवर असतानाही कसोटी जिंकली
रांची कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या. टीम इंडियाने 177 धावांवर 7 विकेट गमावल्या होत्या, परंतु त्यानंतर ध्रुव जुरेलच्या दमदार फलंदाजीमुळे भारताचा पहिला डाव 307 धावांवर संपला. अशाप्रकारे पहिल्या डावाच्या आधारे इंग्लंड संघाला 46 धावांची आघाडी मिळाली. येथे तिसऱ्या डावात खेळपट्टी थोडी खराब दिसली आणि इंग्लंडचा संघ अवघ्या 145 धावा करून सर्वबाद झाला. अशाप्रकारे टीम इंडियाला 192 धावांचे लक्ष्य मिळाले होते, ते भारताने 5 विकेट्स शिल्लक ठेवून पूर्ण केलं.
(हेही वाचा: Maharashtra : “जोपर्यंत सामाजिक कार्यकर्ता होता, तोपर्यंत ठीक…”, मुख्यमंत्री आणि पटोलेंमधील संवाद कोणाबाबत?)