घरICC WC 2023सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली असे केले का? कपिल देव प्रकरणावरून संजय राऊतांचे शरसंधान

सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली असे केले का? कपिल देव प्रकरणावरून संजय राऊतांचे शरसंधान

Subscribe

मुंबई : विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना काल, रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. या सामन्यासाठी भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. यावरून काँग्रेसपाठोपाठ आता ठाकरे गटाने या मुद्द्यावरून केंद्रातील भाजपावर शरसंधान केले आहे. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली असे केले का? असा प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बीसीसीआय आणि आयसीसीला केला आहे.

हेही वाचा – WC Final 2023 : कपिल देव यांना निमंत्रित न केल्याबद्दल काँग्रेसची तीव्र प्रतिक्रिया

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने 50 षटकांत सर्वबाद 240 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 50 षटकांत 241 धावा करायच्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या अवघ्या 47 धावांत तीन विकेट पडल्यानंतर भारतीय संघाला हुरूप आला. पण ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव डाव सावरला. या दोघांनी 192 धावांची भागिदारी केली आणि ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला मात देत पुन्हा सहाव्यांदा विश्वचषचकावर नाव कोरले.

- Advertisement -

मात्र, या सामन्यासाठी 1983मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार कपिल देव यांना आमंत्रण दिले नव्हते. खुद्द कपिल देव यांनीच एका वाहिनीशी बोलताना याची माहिती दिली आहे. अंतिम सामन्याला का गेले नाहीत, असे एका वाहिनीने कपिल देव यांना विचारले असता, ते म्हणाले की, मला निमंत्रण नव्हते. माझ्या 1983मधील सर्व संघाला बोलावायला पाहिजे होते, अशी माझी इच्छा होती, असे कपिल देव म्हणाले.

हेही वाचा – WC Final 2023: ‘मुंबईतून सगळंच खेचून न्यायचं’; राऊतांची टीका म्हणाले, भाजपचा मोठा गेम प्लॅन…

यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांना, अलीकडेच महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत टिप्पणी केली आहे. कपिल देवही स्पष्टपणे आपली भूमिका मांडणारे म्हणून ओळखले जातात. काही महिन्यांपूर्वी आंदोलक महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ ते उघडपणे मैदानात उतरले होते, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला लक्ष्य केले.

आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपालाच लक्ष्य केले आहे. क्रिकेटच्या आयकॉनचा अतिशय निर्लज्जपणे अपमान करण्यात आला आहे; हा भारताचा अपमान आहे. खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. भारतातील सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली असे केले का? असे बीसीसीआय, आयसीसीने जगासमोर स्पष्ट करावे. त्यांना संपूर्ण क्रिकेट जगतासमोर स्पष्टीकरण द्यावे लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -