Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : १५ कोटी म्हणजे किती? लिलावानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूला पडला प्रश्न 

IPL 2021 : १५ कोटी म्हणजे किती? लिलावानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूला पडला प्रश्न 

त्याला संघात घेण्यासाठी बंगळुरू, दिल्ली आणि पंजाब किंग्स यांच्यात स्पर्धा होती.

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी मोसमाआधीचा खेळाडू लिलाव गुरुवारी पार पडला. या लिलावामध्ये अपेक्षेनुसार ग्लेन मॅक्सवेलवर मोठी बोली लागली. दक्षिण आफ्रिकेचा क्रिस मॉरिस हा आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. परंतु, न्यूझीलंडच्या कायेल जेमिसनवर फार मोठी बोली लागेल याची कोणालाही अपेक्षा नव्हती. त्याला संघात घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात स्पर्धा होती. अखेर त्याला तब्बल १५ कोटी रुपयांत आरसीबी संघाने खरेदी केले. त्यामुळे तो आयपीएलमध्ये न्यूझीलंडचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. मात्र, त्याला १५ कोटी रुपये म्हणजे नक्की किती असतात हे ठाऊक नव्हते.

लिलाव पाहताना मजा आली

आयपीएल लिलाव सुरु असताना न्यूझीलंडमध्ये रात्र होती. मी उठून माझा फोन बघितला. काही खेळाडूंना लिलाव पाहायला आवडत नाही. त्यांना भीती वाटते. परंतु, मी तो पाहण्याचा निर्णय घेतला. एक-दीड तास माझे नाव लिलावासाठी आले नाही. आरसीबीने मला खरेदी केल्यानंतर शेन बॉंडने मला मेसेज केला. परंतु, अगदी खरे सांगायचे तर १५ कोटी रुपये म्हणजे न्यूझीलंड डॉलर्समध्ये किती असतात, हे मला ठाऊक नव्हते. मात्र, मला लिलाव पाहताना मजा आली, असे जेमिसन म्हणाला. १५ कोटी रुपये म्हणजे २८ लाख ३४ हजार ३४४ न्यूझीलंड डॉलर्स होतात.

- Advertisement -

 

- Advertisement -