घरक्रीडाआयपीएलच्या नव्या पर्वाचा डिस्ने+हॉटस्टारला फटका बसण्याची शक्यता

आयपीएलच्या नव्या पर्वाचा डिस्ने+हॉटस्टारला फटका बसण्याची शक्यता

Subscribe

वॉल्ट डिस्ने (Walt Disney) कंपनीच्या व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म डिस्ने + हॉटस्टारला (Disney + Hotstar) इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धेचे डिजिटल स्ट्रिमिंग अधिकार खरेदी करता आले नाहीत. त्यामुळे डिस्ने+हॉटस्टारला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वॉल्ट डिस्ने (Walt Disney) कंपनीच्या व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म डिस्ने + हॉटस्टारला (Disney + Hotstar) इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धेचे डिजिटल स्ट्रिमिंग अधिकार खरेदी करता आले नाहीत. त्यामुळे डिस्ने+हॉटस्टारला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा IPL च्या डिजिटल स्ट्रिमिंग अधिकारांसाठीची बोली Viacom18 ने जिंकली. त्यामुळे आता थेट याचा परिणाम डिस्ने+हॉटस्टारच्या सब्सक्रायबर्सच्या संख्येवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Disney plus hotstar could lose 15 million subscribers after failing to win ipl digital rights)

आयपीएल (IPL) स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील डिजिटल, टीव्ही प्रसारणाच्या हक्कांचा लिलाव नुकताच पार पडला. Viacom18 ने भारतीय उपखंडासाठी IPL चे डिजिटल स्ट्रिमिंग राइट्स (Digital Streaming Rihts) 23,758 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. कंपनीला पुढील 5 वर्षांसाठी म्हणजे 2023 ते 2027 पर्यंत हे अधिकार मिळाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, असा असेल भारतीय संघ

वॉल्ट डिस्नेची भारतीय शाखा असलेल्या डिस्ने स्टारला 23,575 कोटी रुपयांना 5 वर्षांसाठी टेलिव्हिजन राइट्स (Television Rights) मिळाले आहेत. यामुळे डिस्ने+ हॉटस्टारच्या सबस्क्रायबर्सची संख्या तब्बल 1.5 कोटींनी कमी होऊ शकते. डिस्ने+ हॉटस्टारच्या एकूण सब्सक्रायबर्सची (Subscribers) संख्या सध्या सुमारे 5 कोटी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आयपीएल लिलावातून बीसीसीआयला ४८ हजार कोटी, मीडिया राईट्सची विक्री पूर्ण

दरम्यान, अचानक इतके सब्सक्रायबर्स कमी झाल्यास हा डिस्ने हॉटस्टारसाठी मोठा धक्का असेल. या कंपनीने 2024 च्या अखेरीस सबस्क्रायबर्स संख्या 23 ते 26 कोटींपर्यंत पोहोचवण्याचं आणि स्ट्रिमिंग सर्व्हिस सेगमेंटमधील ग्लोबल लीडर नेटफ्लिक्सला (Netflix) मागे टाकण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. मात्र, आयपीएल लिलावात बाजी मारण्यात अपयशी ठरल्याने डिस्ने+ हॉटस्टारच्या या उद्दिष्टावर परिणाम होण्याची आणि सबस्क्रायबर्स वाढण्याऐवजी कमी होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – लंडनमध्ये डिनर करताना सचिन शेन वॉर्नच्या आठवणीने झाला भावूक; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -