घरक्रीडाअमर भारत, गोल्फादेवी चौथ्या फेरीत

अमर भारत, गोल्फादेवी चौथ्या फेरीत

Subscribe

जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी

मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या प्रथम श्रेणी स्थानिक गटात एकता संघ, अमर भारत, गोल्फादेवी सेवा या संघांनी चौथ्या फेरीत धडक दिली. नायगाव येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत एकता संघाने श्री गणेश स्पोर्ट्सला ३४-२७ असे नमवत चौथी फेरी गाठली. या सामन्याच्या मध्यंतराला १३-१४ अशा पिछाडीवर पडलेल्या एकता संघाने उत्तरार्धात अप्रतिम खेळ करत विजय साकारला. अरुण सावंत, शुभम पाटील या खेळाडूंनी एकता संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

अमर भारत क्रीडा मंडळाने मनोहर क्रीडा मंडळाचा ४०-१७ असा धुव्वा उडवत आगेकूच केली. मयूर शिवतरकरच्या उत्कृष्ट चढाया आणि त्याला विवेक राणेच्या पकडीची मिळालेली साथ यामुळे अमर भारतने हा सामना जिंकला. गोल्फादेवीने गुड मॉर्निंगला ३८-१९ असे पराभूत करत चौथ्या फेरीत प्रवेश केला. या सामन्याच्या सुरुवातीपासूनच गोल्फादेवीने आक्रमक खेळ केला. त्यामुळे विश्रांतीला त्यांच्याकडे १८-१० अशी भक्कम आघाडी होती. गोल्फादेवीच्या या विजयात अक्षय बिडू, शार्दूल हरचकर हे खेळाडू चमकले.

- Advertisement -

एस.एस.जी फाउंडेशनने तिसर्‍या फेरीत वंदे मातरम मंडळावर ३७-२० अशी मात केली. त्यांच्या या विजयाचे श्रेय पंकज मोहिते, ओमकार सावकार यांना जाते. वंदे मातरमच्या अनिकेत बागवे, हेरंब इंदुलकर यांनी झुंज दिली, पण त्यांना इतरांची साथ लाभली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -