Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांच्यात घटस्फोट?

शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांच्यात घटस्फोट?

भारताचा स्टार फलंदाज शिखर धवनच्या नात्यात दुरावा

Related Story

- Advertisement -

भारताचा सलामीवीर शिखर धवनशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. त्याची पत्नी आयशा मुखर्जीने इन्स्टाग्रामवर एक लांब पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये आयेशाने घटस्फोटावर आपले मत दिले आहे आणि दोनदा घटस्फोट घेतल्यानंतर तिला कसे वाटते हे देखील लिहिले आहे. धवन आणि आयेशा यांनी २००९ मध्ये लग्न केले, आयशाने तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट देखील दिला, ज्यांच्यापासुन तिला २ मुली आहेत.

जेव्हा धवनने त्याच्यापेक्षा सुमारे 10 वर्षांनी मोठ्या आयेशाशी लग्न केले, तेव्हा त्याला खूप टोमणे सहन करावे लागले. मात्र, धवनच्या कुटुंबीयांनी त्याला पाठिंबा दिला. वर्ष २०१४ मध्ये आयेशा ने जोरावर धवन नावाच्या मुलाला जन्म दिला. आयशाशी लग्न केल्यानंतर त्याचे आयुष्य कसे बदलले याबद्दल धवनने अनेक वेळा सांगितले आहे. आयेशाला भेटल्यानंतर तो एक व्यक्ती आणि क्रिकेटपटू म्हणून कसा बदलला हे त्याने अनेक वेळा सांगितले आहे.

- Advertisement -

घटस्फोटासंदर्भात धवनने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्याने कोणतेही विधान जारी केले नाही किंवा सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. यापूर्वी असे वृत्त आले होते की, शिखर आणि आयशा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. एवढेच नाही तर आयशाने तिच्या फीडमधून शिखरची सर्व छायाचित्रे हटवली आहेत.

आयेशा मुखर्जीने इन्स्टाग्रामवर एक लांब पोस्ट शेअर केली आहे ज्यात घटस्फोटावर बरेच काही लिहिले गेले आहे. पश्चिम बंगालमधील मूळच्या आयेशाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, ‘एकदा घटस्फोट घेतल्यावर असे वाटले की दुसऱ्यांदा बरेच काही पणाला लागले आहे. बरेच काही सिद्ध करायचे होते. तर, माझे दुसरे लग्न मोडले तेव्हा ते खूप भीतीदायक होते. मला वाटले की घटस्फोट हा एक घाणेरडा शब्द आहे पण मी दोनदा घटस्फोट घेतला. जेव्हा मी पहिल्यांदा घटस्फोट घेतला तेव्हा मी खूप घाबरले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aesha Mukerji (@apwithaesha)

- Advertisement -

आयेशाने पुढे लिहिले, ‘मला वाटते की मी सर्वांना निराश केले आणि स्वार्थीही वाटले. मला वाटले की मी माझ्या पालकांना निराश करत आहे, माझ्या मुलांना अपमानित करत आहे आणि काही प्रमाणात मला वाटले की मी देवाचाही अपमान केला आहे. घटस्फोट हा एक अतिशय घाणेरडा शब्द आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aesha Mukerji (@apwithaesha)

लोक सोशल मीडियावर शिखर धवनबद्दल प्रश्न विचारत आहेत. ते त्याला टॅगही करत आहेत पण त्याने यावर काहीच सांगितले नाही. शिखर धवन या महिन्यात दुबई मध्ये आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात खेळताना दिसणार आहे. तो दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करतो. दिल्लीचा असलेला धवनने आपल्या कारकिर्दीत ३४ कसोटी, १४५ एकदिवसीय आणि ६८ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. अलीकडेच त्याने श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत टीम इंडियाचे कर्णधारपदही स्वीकारले.


हेही वाचा : WOMEN’S ICC T20I RANKINGS : शेफाली वर्मा पहिल्या स्थानावर

- Advertisement -