घरक्रीडाUS OPEN 2021 : जोकोव्हिच यूएस ओपनच्या उंपांत्य फेरीत

US OPEN 2021 : जोकोव्हिच यूएस ओपनच्या उंपांत्य फेरीत

Subscribe

ग्रँडस्लॅम विजयापासून फक्त दोन विजय दूर

सर्बियाचा जागतिक क्रमांक एकचा खेळाडू नोवाक जोकोव्हिचने इटलीच्या माटेओ बेरेतिनीला हरवून वर्षाच्या शेवटच्या ग्रँड स्लॅम यूएस ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. जोकोव्हिचने तीन तास २६ मिनिटे चाललेल्या सामन्यात बेरेटिनीचा ५-७, ६-२, ६-२, ६-३ असा पराभव केला. यासह, जोकोव्हिच कॅलेंडर ग्रँड स्लॅम पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आला आहे.

जोकोव्हिचने या हंगामात ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन जेतेपद पटकावले. तो आता मोसमातील चौथा ग्रँडस्लॅम जिंकण्यापासून फक्त दोन विजय दूर आहे. जर जोकोव्हिचने यूएस ओपन जिंकले तर तो कॅलेंडर ग्रँड स्लॅम पूर्ण करणारा रॉड लेव्हरनंतरचा पहिला खेळाडू ठरेल.

- Advertisement -

या यूएस ओपन मोहिमेतील पाच सामन्यांत चौथी वेळ आहे. ज्यात जोकोव्हिचने पहिला सेट गमावल्यानंतर सामना सहज जिंकला आहे. जोकोव्हिचचा उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेवशी सामना होईल. दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत झ्वेरेवने दक्षिण आफ्रिकेच्या लॉयड हॅरिसचा सरळ सेटमध्ये पराभव केला.

- Advertisement -

बेरेटिनी विरुद्धच्या सामन्यात जोकोव्हिचने पहिल्या सर्व्हिसमधून ७४ टक्के गुण मिळवले, तर बेरेटिनीने ६० टक्के गुण मिळवले. दुसऱ्या सर्व्हिसमध्ये जोकोव्हिचने ६६ टक्के आणि बेरेटिनीने ५० टक्के गुण मिळवले. जोकोव्हिचने या सामन्यात २८ तर बेरेटिनीने ४३ अनफोर्स एरर केल्या.

जोकोव्हिच टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीच्या लढतीत जर्मन खेळाडूकडून झालेल्या पराभवाचा बदला घेईल. जोकोव्हिचचा पुढील सामना जर्मनीच्या एलेक्सझॅंडर झ्वेरेव सोबत ११ सप्टेंबरला होणार आहे. या आधी नऊ वेळा हे दोघे आमने सामने आले असून जोकोव्हिचे पारडे जड दिसत आहे. जोकोव्हिच सहा वेळा विजयी झाला आहे, तर एलेक्सझॅंडर झ्वेरेवने तीन वेळा विजय मिळवला आहे. दोघांची शेवटची लढत टोकियो ऑलिंम्पिक २०२० मध्ये उंपांत्य फेरीच्या सामन्या झाली त्यात जोकोव्हिचला एलेक्सझॅंडर झ्वेरेवकडून ६-१ , ३-६, १-६ असा पराभव पत्करावा लागला.
जोकोव्हिच टोकियो ऑलिंम्पिक सामन्याच्या पराभवाचा बदला कशाप्रकारे घेतो हे पहावे लागेल.


हेही वाचा : “दादा” झळकणार बॉलीवूड पडद्यावर, गांगुलीच्या बायोपिकची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -