Eco friendly bappa Competition
घर क्रीडा जोकोविचने कोरले 24 ग्रॅंडस्लॅमवर नाव; ओपन एरामध्ये सर्वाधिक विजेतेपद पटकवणारा खेळाडू

जोकोविचने कोरले 24 ग्रॅंडस्लॅमवर नाव; ओपन एरामध्ये सर्वाधिक विजेतेपद पटकवणारा खेळाडू

Subscribe

सर्बियन टेनिस स्टार नोवाक जोकोविच यांने यूएस ओपन 2023 ची अंतिम फेरी सरळ सेटमध्ये जिंकली. त्याने मेदवेदेवचा 6-3, 7-6, 6-3 असा पराभव केला.

नवी दिल्ली : सध्या टेनिस विश्वात एकाच खेळाडूची चर्चा सुरू आहे. तो म्हणजे नोवाक जोकोविच. कारण, त्यांने यूएस ओपन 2023 जिंकली असून, त्याच्या नावावर हे 24 वे ग्रॅंडस्लॅम आहे. तर या कामगिरीमुळे तो ओपन एरामध्ये सर्वाधिक विजेतेपद पटकवणारा खेळाडू ठरला आहे.(Djokovic marks 24 Grand Slams Player with the most titles in the Open Era)

सर्बियन टेनिस स्टार नोवाक जोकोविच यांने यूएस ओपन 2023 ची अंतिम फेरी सरळ सेटमध्ये जिंकली. त्याने मेदवेदेवचा 6-3, 7-6, 6-3 असा पराभव केला. यासह जोकोविचचे दोन वर्षे जुने खातेही सुटले. वास्तविक, दोन वर्षापूर्वीसुद्धा असाच खेळ झाला होता. हेच दोन खेळाडू अंतिम फेरी खेळत होते. फरक एवढाच होता की त्यावेळी चॅम्पियन झालेल्या खेळाडूचे नाव नोव्हाक जोकोविच नसून डॅनिल मेदवेदेव होते. मेदवेदेवने 2021 च्या यूएस ओपनच्या अंतिम फेरीत जोकोविचचा 6-4,6-4, 6-4 असा पराभव केला. तेव्हा जोकोविचने त्या पराभवाचा बदला घेतल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा : आरक्षण हा सामाजिक मुद्दा, राजकारण करू नका; मुख्यमंत्री शिंदेचे विरोधकांना आवाहन

जोकोविचच्या नावावर 24 वे ग्रँडस्लॅम

नोवाक जोकोविच यूएस ओपन चॅम्पियन आहे. चौथ्यांदा त्यांने अमेरिकेच्या हार्ड कोर्टवर आपले वर्चस्व खणखणीत पद्धतीने दाखवून दिले आहे. नोवाक जोकोविचचा हा 24 वा ग्रँडस्लॅम विजय असून, त्याचा हा एक नवा विक्रम आहे. त्याने मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक 24 ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. आतापर्यंत कोणत्याही पुरुष टेनिसपटूने इतकी ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकलेली नाहीत. जोकोविचच्या ग्रँडस्लॅम विजेतेपदांची संख्या आता राफेल नदालपेक्षा दोनने अधिक आहे.

- Advertisement -

हेही वाचा : India Alliance : जी20च्या स्नेहभोजनाला ममता बॅनर्जी यांची उपस्थिती, काँग्रेसची नाराजी

विजयी झाल्यानंतर जोकोविचने केले हे दोन कामे

नोवाक जोकोविच याने यूएस ओपनचे हे ग्रॅंडस्लम पद चौथ्यांदा जिंकले आहे. विजयी झाल्यानंतर त्याने प्रथमत: त्याच्या मुलगी आणि परिवाराची गळाभेट घेतली. यावेळी तो भावनिक झाला होता. तर नंतर त्यांने अमेरिकेचे महान बास्केटबॉल खेळाडू कोब ब्रायंट यांची आठवण काढत त्यांच्या नावासह नंबर असलेली जर्शी घातली. यावेळी टेनिस कोर्टमध्ये वेगळेच वातावरण तयार झाले होते.

- Advertisment -