घरक्रीडाFrench Open 2020 : डॉमिनिक थीमची चौथ्या फेरीत धडक 

French Open 2020 : डॉमिनिक थीमची चौथ्या फेरीत धडक 

Subscribe

थीमने नॉर्वेच्या कॅस्पर रुडला पराभूत केले.  

तिसऱ्या सीडेड ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमने फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. त्याला तिसऱ्या फेरीच्या सामन्यात सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश आले. मात्र, त्यानंतरही त्याने नॉर्वेच्या कॅस्पर रुडला ६-४, ६-३, ६-१ असे सरळ सेटमध्ये पराभूत करत चौथी फेरी गाठली. काही दिवसांपूर्वीच झालेल्या अमेरिकन ओपनचे जेतेपद पटकावणारा थीम फ्रेंच ओपनमध्येही दमदार कामगिरी करण्यास उत्सुक आहे. त्याला याआधी फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत दोनदा राफेल नदालने पराभूत केले आहे.

सामना जिंकल्याचा आनंद

यंदाच्या स्पर्धेची मात्र थीमने चांगली सुरुवात केली. पुरुष एकेरीतील तिसऱ्या फेरीच्या सामन्यात थीमने रुडवर ६-४, ६-३, ६-१ अशी सरळ सेटमध्ये मात केली. या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये थीमला चांगली सर्विस करता आली नाही. मात्र, त्यानंतरच्या दोन सेटमध्ये त्याने खेळात सुधारणा करत विजय मिळवला. ‘हा सामना जिंकल्याचा आनंद आहे. या सामन्यात मी चुका केल्या नाहीत. कॅस्परविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असते. या सामन्यात आम्ही दोघांनीही चांगला खेळ केला,’ असे सामन्यानंतर थीम म्हणाला.

- Advertisement -

सिमोन हालेपची आगेकूच 

महिलांमध्ये अव्वल सीडेड सिमोन हालेपला आगेकूच करण्यात यश आले. तिने २५ व्या सीडेड अमेरिकेच्या अमांडा अनिसीमोव्हाचा ६-०, ६-१ असा धुव्वा उडवला. या सामन्यात हालेपने तब्बल ६ वेळा अनिसीमोव्हाची सर्विस मोडली. तिसऱ्या सीडेड एलिना स्वीतोलिनानेही चौथी फेरी गाठली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -