घरक्रीडा'हा' माजी खेळाडू म्हणतो, लहान मुलांची तुलना धोनीशी करू नका

‘हा’ माजी खेळाडू म्हणतो, लहान मुलांची तुलना धोनीशी करू नका

Subscribe

युवराज सिंग म्हणाला की, तरुण खेळाडूंची तुलना धोनीशी करू नका आणि त्यांना मुक्तपणे खेळण्याचं स्वातंत्र्य द्या.

क्रिडा विश्वात सध्या धोनीवरुन बरीच चर्चा सुरु आहे. दरम्यान, आता माजी अष्टपैलू युवराज सिंग जो भारताच्या दोन विश्वचषकातील विजयाचा नायक होता, त्याने महेंद्रसिंग धोनीबद्दल मोठं विधान केलं आहे. इंस्टाग्रामवर लाइव्ह चॅट दरम्यान युवराज सिंग म्हणाला की, महेंद्रसिंग धोनीची तुलना ऋषभ पंत आणि केएल राहुल यांच्याशी करणं चुकीचं ठरेल. युवराज सिंग म्हणाला की, तरुण खेळाडूंची तुलना धोनीशी करू नका आणि त्यांना मुक्तपणे खेळण्याचं स्वातंत्र्य द्या. युवराज म्हणाला, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यासारख्या खेळाडूंनी मैदानावर जाऊन हिटिंग करायला सुरवात करावी, असं जर एखाद्याला वाटत असेल तर तसं होत नाही. त्यांना त्या पातळीवर जाण्यासाठी वेळ लागेल.

dhoni and yuvraj

- Advertisement -

युवराज सिंग म्हणाला की, आजकाल युवा क्रिकेटपटूंकडून खूप लवकर अपेक्षा ठेवल्या जात आहेत. आणि याचं सर्वात मोठं कारण सोशल मीडिया आहे. युवराज पुढे म्हणाला की, युवा खेळाडूंना हे समजले पाहिजे की कसोटी क्रिकेट हे वास्तविक क्रिकेट आहे आणि त्यामधून त्यांना बरंच काही शिकता येईल. युवा खेळाडूंनी केवळ टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू नये. आयपीएल ही एक मोठी आणि विलक्षण स्पर्धा आहे, परंतु युवा खेळाडूंनी क्रिकेटचे सर्वात मोठे स्वरूप विसरू नये.

msd n yuvi

- Advertisement -

याशिवाय, युवराज विनोदी पद्धतीने म्हणाला की, लॉकडाउनमध्ये केसांची मोठी समस्या आहे, केस सतत वाढत आहेत आणि ते कापताही येत नाहीत. युवी म्हणाला की, केस वाढवण्याचा विचार करत आहे, जेणेकरून त्याला म्हातारपणात त्रास होऊ नये.

msd and yuvi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -