घरक्रीडाIPL 2022 Double Header: आयपीलचा मेगा डे, आज मैदानात उतरणार तीन सलामीवर...

IPL 2022 Double Header: आयपीलचा मेगा डे, आज मैदानात उतरणार तीन सलामीवर प्लेअर्स

Subscribe

आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामाला सुरूवात झाली आहे. आज आयपीएलचा मेगा डे असून त्रिकूटाची जोडी मैदानात उतरणार आहेत. आयपीएलमध्ये आज दोन सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचा माजी कॅप्टनकूल महेंद्रसिंग धोनी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली मैदानात खेळताना दिसणार आहेत.

महेंद्र सिंग धोनी आणि रोहित शर्मा आता जिंकण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघांनी या सामन्यामध्ये ३-३ सामने खेळले आहेत. मात्र, एकाही सामन्यात या दोन्ही संघांना विजय मिळालेला नाहीये. चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पहिला सामना होणार आहे. यामध्ये चन्नईचा कर्णधार रवींद्र जाडेजा आणि हैदराबादचा कर्णधार केन विलियमसन हे दोघे एकत्र भिडताना दिसणार आहेत.

- Advertisement -

डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये रंगणार पहिला सामना

चेन्नईने आतापर्यंत तीन आणि हैदराबादने दोन सामने खेळले आहेत. या दोन्ही संघांचा सामना डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला ३.३० वाजता सुरूवात होणार आहे. या सामन्यात चाहत्यांचं लक्ष धोनी, जडेजा आणि विलियमसन यांच्यावर असणार आहे. यांच्या व्यतिरिक्त ड्वेन ब्रावो, मोईन अली, शिवम दुबे, एडेन मार्करम आणि निकोलस पूरन यांसारख्या खेळाडूंवर सुद्धा क्रिकेट प्रेमींचं लक्ष राहणार आहे.

- Advertisement -

दुसऱ्या सामन्यात रोहित-कोहली आमनेसामने

आयपीएलचा दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यामध्ये होणार आहे. यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली आमनेसामने दिसणार आहेत. दुसरा सामना पुण्यातील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात विराट आणि रोहित व्यतिरिक्त फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, इशान किशन, सूर्यकुमार यादव, किरण पोलार्ड आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या खेळाडूंवर सुद्धा चाहत्यांचं लक्ष राहणार आहे.


हेही वाचा : तुम्ही व्यक्तिगत माणसाच्या घरावर का जात आहात?, जितेंद्र आव्हाडांचा सवाल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -