IND vs NZ : सलग तीन षटकार मारत शुभमन गिलचे न्यूझीलंडसमोर दमदार द्विशतक

श्रीलंके विरुद्धच्या दमदार विजयानंतर भारतीय संघाची न्यूझिलंडविरुद्ध वनडे मालिका सुरू आहे. आज भारत आणि न्यूझिलंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाता सलामीवीर शुभमन गिलने तुफानी खेळी करत द्विशतक केले.

श्रीलंके विरुद्धच्या दमदार विजयानंतर भारतीय संघाची न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका सुरू आहे. आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाता सलामीवीर शुभमन गिलने तुफानी खेळी करत द्विशतक केले. आजच्या सामन्यात गिलने संपूर्ण मैदानात षटकारांचा पाऊस पाडला. विशेष म्हणजे सलग तीन षटकार मारत गिलने आपले द्विशतक पूर्ण केले. या द्विशतकी खेळीच्या जोरावर वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात कमी इनिंग्जमध्ये १००० धावांचा विक्रम शुभमनने नावावर केला.

शुभमन गिलने (Shubman Gill) आजच्या सामन्यात रेकॉर्ड ब्रेकिंग खेळी करताना भारतीय संघाला धावांचा डोंगर उभारून दिला. रोहित शर्मा, विराट कोहली व इशान किशन हे आघाडीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर शुभमनने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली. फलंदाजी करताना गिलने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. अतिशय धुलाई करत गिलने विक्रमी धावा केल्या. (Double hundred for Shubman Gill from 145 balls Shubman Gill becomes the youngest ever double centurion in ODI cricket)

आजच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिलला सूर्यकुमार यादव व हार्दिक पांड्या यांची तुल्यबळ साथ मिळाली. सूर्या व शुभमन यांनी भारताचा डाव सावरताना ५२ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी केली. डॅरील मिचेलने सूर्या ३१ धावांवर सँटनरच्या हातात सोपा झेल देऊन माघारी पाठवले. तसेच, हार्दिक पांड्या व शुभमन यांनी ६७ चेंडूंत ७४ धावांची भागीदारी केली. या सामन्यात रोहित शर्मा ३८ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकार मारत ३४ धावा करत माघारी परतला. विशेष म्हणजे विराट कोहली (८) व इशान किशन (५) हे स्वस्तात माघारी परतले. त्याना जास्त धावा करता आल्या नाही.

शुभमन गिलने ८६ चेंडूंत शतक पूर्ण केले. गिलचे हे वन डे क्रिकेटमधील तिसरे शतक ठरले. वन डे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात कमी इनिंग्जमध्ये १००० धावांचा विक्रम शुभमनने नावावर केला. शुभमनने १७५+ धावा करताच सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. हैदराबादच्या या मैदानावरील वनडे क्रिकेटमधील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. सचिनने २००९मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७५ धावांचा विक्रम मोडला. शुभमनने अखेरपर्यंत दमदार फलंदाजी करताना द्विशतक पूर्ण केले. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, इशान किशन यांच्यानंतर वनडेमध्ये द्विशतक झळकावणारा शुभमन गिल पाचवा भारतीय फलंदाज ठरला. त्याने ४९व्या षटकात सलग तीन षटकार खेचून द्विशतक पूर्ण केले.


हेही वाचा – आयसीसीच्या घोळामुळे दोन तासांत झालं होत्याचं नव्हतं, भारतीय चाहत्यांमध्ये नाराजी