घरक्रीडाIPL चा तेरावा हंगाम रंगणार Dream 11 च्या टायटलखाली

IPL चा तेरावा हंगाम रंगणार Dream 11 च्या टायटलखाली

Subscribe

IPL च्या मुख्य प्रायोजकत्वातून विव्होने माघार घेतल्यानंतर मुख्य प्रायोजकत्वाची (Title Sponsorship) माळ कोणाच्या गळ्यात पडणार हा प्रश्न सर्वांना पडला होता. अखेर या प्रश्नाला उत्तर मिळाले आहे. IPL चा तेराव्या हंगामाचे मुख्य प्रायोजकत्व Dream 11 कडे असणार आहे. याबाबतची माहिती IPL आयुक्त ब्रिजेश पटेल यांनी दिली. त्यामुळे आता १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान Dream 11 IPL 2020 ही बहुप्रतिक्षित स्पर्धा रंगणार आहे.

- Advertisement -

IPL च्या मुख्य प्रायोजकत्वाच्या शर्यतीत टाटा समुहासह अनेक बड्या कंपन्या होत्या. मात्र, Dream 11 ने २५० कोटींची बोली लावत ही शर्यत जिंकली. आयपीएलचा मुख्य प्रायोजक होण्याच्या शर्यतीत टाटा आणि बायजूस अकादमी होती. टाटाने १८० कोटी आणि बायजूसने १२५ कोटींची बोली लावली होती. Dream 11 ने २५० कोटींची बोली लावत IPL 2020 चा मुख्य प्रायोजक म्हणून हक्क मिळविला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -