घरक्रीडाRussia-Ukraine Crisis: No War Please..रशियाच्या टेनिसपटूने युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिला अनोखा संदेश, व्हिडिओ...

Russia-Ukraine Crisis: No War Please..रशियाच्या टेनिसपटूने युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिला अनोखा संदेश, व्हिडिओ व्हायरल

Subscribe

रशियाचा टेनिसपटू आंद्रे रूबलेव्हने रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर नव्या अंदाजात एक खास संदेश दिला आहे. या संदेशानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दुबईतील टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन दिवसांपूर्वी उपांत्य फेरीचा सामना जिंकल्यानंतर आंद्रे रूबलेव्हने अनोख्या पद्धतीचे कृत्य केल्यामुळे त्याची जगभरात चर्चा होत आहे. तसेच रूबलेव्हचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रूबलेव्हने उपांत्य फेरीत ५ वा मानांकित खेळाडू हुबर्ट हुरकाझचा ३-६,७-५,७-६ ने पराभव केला. हा सामना जिंकल्यानंतर रूबलेव्हने कॅमेऱ्यावर नो वॉर प्लीज अशा खास अंदाजात संदेश देत एक प्रकारे त्यानेही शांततेचं आवाहन केलंय.

सामना जिंकल्यानंतर रूबलेव्ह टीव्ही ब्रॉडकास्टरच्या कॅमेऱ्याच्या जवळ गेला आणि कॅमेऱ्यावर नो वॉर प्लीज असं स्क्रिनवर लिहिलं आहे. रूबलेव्हने हा संदेश लिहिताच त्याचे चाहते एकदम भावूक झाले. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रुबलेव्हने इन्स्टाग्रामवर दोन्ही देशांचे झेंडे ऐकमेकांना आलिंगन देतानाचा फोटो पोस्ट केला आहे.

- Advertisement -

मागील आठवड्यात उत्कृ्ष्ट फॉर्ममध्ये असलेल्या रूबलेव्हने गेल्या रविवारी मार्सेलिसमध्ये विजेतेपद पटकावले होते. यंदाच्या आठवड्यात दुबईमध्ये अगदी कठीण परिस्थितीत संघर्ष करत दोन सामन्यांमध्ये जेतेपद पटकावले. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमाकांचा खेळाडू असलेल्या रूबलेव्हने उपांत्या फेरीच्या लढतीत पोलंडच्या हेरकाझचा ३-६,७-५,७-६ असा पराभव केला. अंतिम सामन्यात त्याचा सामना डेनिस शापोवालोव्ह आणि जिरी वेसेली यांच्याशी झाला होता.

- Advertisement -

रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईमुळे जगातील बहुतांश देशांमध्ये संताप आणि रोष व्यक्त करण्यात येत आहे. क्रिडा जगतावरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सर्व आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघांना रशियात होणाऱ्या आगामी स्पर्धा रद्द करण्याचे आवाहन केले आहे. आता आयओसीच्या या आवहानानंतर या संस्थेशी संलग्न देशांचे क्रीडा महासंघ काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : Pro Kabaddi League Final : दबंग दिल्ली प्रथमच प्रो कबड्डी लीग चॅम्पियन, पाटणा पायरेट्सचा 1 गुणाने पराभव


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -