घरक्रीडारन मशीन झाली डक मशीन; आयपीएलमध्ये कोहलीची 10 वर्षातील सर्वात खराब सरासरी

रन मशीन झाली डक मशीन; आयपीएलमध्ये कोहलीची 10 वर्षातील सर्वात खराब सरासरी

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगमधील (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा माजी कर्णधार विराट कोहली यंदाच्या पर्वात उत्तम कामगिरी करताना दिसत नाही. आयपीएलच्या 15 व्या पर्वाच्या सुरूवातीच्या सामन्यापासूनच विराट फॉर्ममध्ये दिलत नाही. विराट आतापर्यंतच्या सामन्यात यशस्वी खेळी करण्याचा प्रयत्न केला, परंत, त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरत आहे.

इंडियन प्रिमीयर लीगमधील (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा माजी कर्णधार विराट कोहली यंदाच्या पर्वात उत्तम कामगिरी करताना दिसत नाही. आयपीएलच्या 15 व्या पर्वाच्या सुरूवातीच्या सामन्यापासूनच विराट फॉर्ममध्ये दिलत नाही. विराट आतापर्यंतच्या सामन्यात यशस्वी खेळी करण्याचा प्रयत्न केला, परंत, त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरत आहे. अशातच आयपीएलमध्ये गेल्या 10 वर्षांत विराटची सरासरी प्रथमच 20 च्या खाली राहिली आहे.

यंदाच्या पर्वात विराट केवळ 19.6 च्या सरासरीने खेळत आहे. शिवाय काल झालेल्या सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यात शुन्यावर बाद झाला. त्यामुळं रन मशिन विराट कोहलीचे चाहतेही नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय क्रिकेट दिग्गजांमध्येही विराटच्या फॉर्मची चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यात फिरकीपटू जगदीश सुचित याच्या चेंडूवर विराट कोहली खाते न उघडताच बाद झाला. विराट आतापर्यंत तिसऱ्यांदा एकही धाव न काढता पॅव्हेलियनच्या दिशेने माघारी परतला. आयपीएल 15 मध्ये विराट 3 वेळा गोल्डन डकचा बळी ठरला आहे, म्हणजेच पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला आहे.

दरम्यान, विराट कोहलीला रन मशीन म्हणून ओळखलं जातं. याआधी भारतीय संघाचा कर्णधार असताना विराट कोहली याने तुफानी फलंदाजी केली आहे. अनेक गोलंदाजांचा त्याने चांगलाच समाचार घेतला. मैदानात षटकारांचा पाऊसही पाडला. परंतु, सध्या त्याच फॉर्म दिसत नाही. विराटला मोठी धावसंख्या करता येत नाहीये. त्यामुळे विराटच्या फॉर्मची सर्वनांच उस्तुकता लागली आहे.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या खेळीच्या प्रतिक्षेत

23 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने शेवटचे शतक झळकावलं होतं. त्यानंतर त्याला एकही शतक झळकावता आलेले नाही. एकेकाळी 100 आंतरराष्ट्रीय शतकांची अपेक्षा असलेल्या या फलंदाजाचे 71 वे शतक आता चाहत्यांसाठी स्वप्नवत झाले आहे.


हेही वाचा – IPL 2022: टाटा यांचे ‘ते’ चॅलेंज रोहितने केलं पूर्ण; सर्वत्र होतेय चर्चा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -