घरक्रीडा‘या’ कारणामुळे हरमनप्रीत कौरची महिला बिग बॅश लीगमधून माघार

‘या’ कारणामुळे हरमनप्रीत कौरची महिला बिग बॅश लीगमधून माघार

Subscribe

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने बिग बॅश लीगमधून माघार घेतली आहे. पाणीच्या दुखापतीमुळे हरमनप्रीत कौरने बुधवारी माघार घेतली आहे. याबाबत बिग बॅश लीगमधील तिचा असलेला संघ मेलबर्न रेनेगेड्सने माहिती दिली आहे.

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने बिग बॅश लीगमधून माघार घेतली आहे. पाणीच्या दुखापतीमुळे हरमनप्रीत कौरने बुधवारी माघार घेतली आहे. याबाबत बिग बॅश लीगमधील तिचा असलेला संघ मेलबर्न रेनेगेड्सने माहिती दिली आहे. हरमनप्रीतच्या माघारानंतर इंग्लंडची फलंदाज ईव्ह जोन्स मेलबर्न रेनेगेड्स संघाकडून खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Due To Back Injury Harmanpreet Kaur Withdraws From Womens Big Bash League)

हरमनप्रीतच्या जागी इंग्लंडची फलंदाज ईव्ह जोन्स मेलबर्न रेनेगेड्स संघाकडून खेळू शकते. त्याशिवाय, “हरमनप्रीत आमच्यासाठी गेल्या मोसमात अप्रतिम होती आणि आम्हाला या वर्षी तिला आमच्या संघाचा भाग म्हणून पाहायचे होते. परंतु दुर्दैवाने तिला दुखापतीमुळे वगळण्यात आले आहे. तसेच, उर्वरित टूर्नामेंटसाठी आम्ही आमच्या संघासाठी सर्वोत्तम रणनीती तयार करत असल्यामुळे पुढील काही सामन्यांसाठी ईव्ह आमच्या संघासोबत असेल”, असे मेलबर्न रेनेगेड्सचे संघव्यवस्थापक जेम्स रोसेनगार्टन यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

सध्याची महिला बिग बॅश लीग टूर्नामेंटची खेळाडू हरमनप्रीतने भारताला आशिया चषक विजेतेपद मिळवून दिले आहे. तिच्या या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेमुळे तिला मेलबर्न रेनेगेड्स संघाकडून सुरुवातीचे दोन सामने खेळता आले नाहीत.

हरमनप्रीतने गेल्या मोसमात 130.96 च्या स्ट्राइक रेटने 406 धावा करून प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार जिंकला होता. त्याचबरोबर तिने गोलंदाजीत देखील आपली छाप पाडली. तिने 13 सामन्यात 15 विकेट घेतल्या.

- Advertisement -

हेही वाचा – टी-20 विश्वचषकात यूएईच्या युवा खेळाडूची हॅटट्रिक; गोलंदाजाची सर्वत्र चर्चा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -