घरक्रीडाआयपीएलचे 15वे पर्व सुरू होण्यापूर्वीच चेन्नईच्या संघाला मोठा धक्का; 'हा' खेळाडू संघाबाहेर

आयपीएलचे 15वे पर्व सुरू होण्यापूर्वीच चेन्नईच्या संघाला मोठा धक्का; ‘हा’ खेळाडू संघाबाहेर

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15व्या पर्वाची सुरूवात 31 मार्चपासून होणार आहे. आयपीएलसाठी सर्वा खेळाडूंनी तयारीला सुरूवात केल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र यंदाचा आयपीएलचा हंगामा सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15व्या पर्वाची सुरूवात 31 मार्चपासून होणार आहे. आयपीएलसाठी सर्वा खेळाडूंनी तयारीला सुरूवात केल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र यंदाचा आयपीएलचा हंगामा सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघातील खेळाडू काईल जेम्सन दुखापतीमुळे संघाबाहेर पडला आहे. विशेष म्हणजे काईल जेम्सनला झालेली दुखापत गंभीर असल्यामुळे तो दिर्घकाळ संघाबाहेर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Due To Back Stress Fracture Kyle Jamieson Ruled Out From Ipl 2023 Chennai Super Kings)

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेम्सनला पाठीवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे तो 9 महिन्यांहून अधिक काळ क्रिकेटपासून दूर आहे. आता तो आयपीएल 2023 मध्येही खेळू शकणार नाही. याबाबत न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी दिलेल्या माहितीनुसार, काईलसाठी हा एक आव्हानात्मक आणि कठीण काळ आहे. जेमीसनने यापूर्वी आशा व्यक्त केली होती की त्याची दुखापत विश्रांतीने बरी होईल. परंतु, ती बरी झाल्यानंतर त्याला शस्त्रक्रियेचा पर्याय निवडणे भाग पडले. अनेक जागतिक दर्जाच्या खेळाडूंच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यातून बरे होण्यासाठी वेळ लागतात.

- Advertisement -

दरम्यान, जून 2022 मध्ये शेवटची कसोटी खेळल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत काईल जेम्सनने पुनरागमन करणे अपेक्षित होते. मात्र, दुखापती आणि शस्त्रक्रियेची पुनरावृत्ती लक्षात घेता, त्याला पूर्ण तंदुरुस्ती मिळविण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

यंदाच्या आयपीएलसाठी काइल जेम्सनला चेन्नई सुपर किंग्जने काईल जेम्सनला 1 कोटींमध्ये खरेदी केले होते. जेमसनने आतापर्यंत आयपीएलच्या 9 सामन्यात 9 विकेट घेतल्या. दरम्यान, चेन्नईच्या संघाला आयपीएलचे 15वे पर्व सुरू होण्यापूर्वीच धक्का बसल्याची बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – border gavaskar trophy : अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -