घरक्रीडाअजिंक्य रहाणे दुसऱ्या देशाच्या संघातून खेळणार; बीसीसीआयला वैतागत घेतला मोठा निर्णय

अजिंक्य रहाणे दुसऱ्या देशाच्या संघातून खेळणार; बीसीसीआयला वैतागत घेतला मोठा निर्णय

Subscribe

भारतीय संघातील दिग्गज खेळाडू अजिंक्य रहाणे याने नुकताच झालेल्या रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) अजिंक्य रहाणेने चांगली कामगिरी केली. मात्र असं असतानाही बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी (Border–Gavaskar Trophy) अजिंक्य रहाणेची भारतीय संघात निवड करण्यात आलेली नाही.

भारतीय संघातील दिग्गज खेळाडू अजिंक्य रहाणे याने नुकताच झालेल्या रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) अजिंक्य रहाणेने चांगली कामगिरी केली. मात्र असं असतानाही बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी (Border–Gavaskar Trophy) अजिंक्य रहाणेची भारतीय संघात निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे अजिंक्य रहाणेने आता मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, अजिंक्य रहाणे यावर्षी काऊंटी क्रिकेटमध्ये लीसेस्टरशरकडून (Leicestershire sign Ajinkya Rahane for 2023 season) खेळताना दिसणार आहे.

अजिंक्य रहाणेने गेल्यावर्षी जानेवारीमध्ये भारताकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात संधी देण्यात आली नाही. लीसेस्टरशर क्लबतर्फे करण्यात आलेल्या घोषणेनुसार, अजिंक्य रहाणे आयपीएलच्या स्पर्धेनंतर 8 काऊंटी सामने आणि वनडे कपच्या संपूर्ण सत्रासाठी संघाकडून खेळणार आहे. (due to fed up with bcci ajinkya rahane took a big step to play for leicestershire in 2023 county season)

- Advertisement -

“मी येणाऱ्या काळात लीसेस्टरशरसोबत खेळणार असल्याचा मला आनंद आहे. लीसेस्टरशरच्या खेळाडूंसोबत खेळण्यास मी फार उत्सुक आहे”, असे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचं प्रतिनिधित्व करणारा अजिंक्य रहाणेने लीसेस्टरशर क्रिकेट संघाच्या वेबसाईटशी बोलताना सांगितले.

अजिंक्य रहाणे याने 2019 मध्ये हॅम्पशायरकडून खेळताना काऊंटी डेब्यू करत नॉटिंघमशरविरूद्ध शतक ठोकले होते. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टेस्ट सामन्यासाठी बीसीसीआय अजिंक्य रहाणेच्या नावाचा विचार करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे

- Advertisement -

अजिंक्य रहाणे दीर्घकाळापासून भारताकडून कोणत्याच फॉर्मेटमध्ये खेळलेला नाही. रहाणेने सातत्याने भारतीय संघात (Team India) कमबॅक करण्यासाठी प्रयत्न केले. शिवाय, मुंबईकडून खेळताना आणि संघाचं नेतृत्व सांभाळताना अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) जवळपास प्रत्येक सामन्यांमध्ये चांगला खेळ दाखवला आहे. हैदराबादविरूद्धच्या सामन्यात अजिंक्यने 204 रन्सची खेळी केली होती. त्यानंतर देखील त्याच्या बॅटमधून रन्सचा पाऊस पहायला मिळाला.

आतापर्यंत 6 सामन्यामध्ये त्याने 11 डावांमध्ये उत्तम सरासरीने 634 रन्स केले आहे. यामध्ये एक द्विशतक आणि एका 191 रन्सच्या खेळाची समावेश आहे. आसामच्या टीमविरूद्ध त्याने हा उत्तम खेळ केला होता. शिवाय दिल्लीविरूद्धच्या सामन्यात ही त्याने अर्धशतक झळकावले होते.


हेही वाचा – IND vs NZ 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंडदरम्यान अहमदाबादमध्ये आज निर्णायक लढत

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -