घरक्रीडाCSK vs GT IPL 2023 : पावसामुळे आयपीएल आजचा अंतिम सामना रद्द;...

CSK vs GT IPL 2023 : पावसामुळे आयपीएल आजचा अंतिम सामना रद्द; आज ठरणार जेतेपद विजेता

Subscribe

आयपीएल २०२३ चा आजचा अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणारा आजचा सामना राखीव दिवशी म्हणजेच सोमवर २९ मे रोजी होणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२३) आजचा अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणारा आजचा सामना राखीव दिवशी म्हणजेच सोमवर २९ मे रोजी होणार आहे. (due to heavy rainfall Ipl 2023 Final Between Chennai Super Kings And Gujrat Titans play on 29 Th June Reserve Day For Match)

चेन्नई आणि गुजरात यांच्यात हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ७.३० वाजता सुरु होणार होता. मात्र, मैदानात पावसाच्या सरी कोसळल्याने सामन्यात व्यत्यय आलं आहे. जर हा सामना ९.३५ वाजता सुरु झाला, तर हा सामना पूर्ण २० षटकांचा खेळवला जाईल. दोन्ही संघाना २० षटके मिळतील. पण १२.०६ वाजेपर्यंत पाच षटकांचा सामना झाला नाही, तर सोमवारी राखीव दिवशी २९ मे ला पुन्हा हा फायनलचा सामना खेळवण्यात येईल.

- Advertisement -

सोमवारीही हा सामना झाला नाही, तर गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्सला यंदाच्या आयपीएल हंगामाचं जेतेपद देण्यात येईल.

दरम्यान, आजचा सामना चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा अखेरचा सामना असल्याची चर्चा रंगली असतानाच चेन्नईचा महत्त्वाचा फलंदाज अंबाती रायुडू याने निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे चेन्नई संघाला सामन्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2023 FINAL : अंतिम सामन्यापूर्वी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूने जाहीर केली निवृत्ती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -