घरक्रीडान्यूझीलंडचा 'हा' खेळाडू दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर

न्यूझीलंडचा ‘हा’ खेळाडू दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर

Subscribe

इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना इग्लंडने जिंकला. त्यामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) इंग्लंडच्या गुणांमध्ये वाढ झाली आहे.

इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना इग्लंडने जिंकला. त्यामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) इंग्लंडच्या गुणांमध्ये वाढ झाली आहे. मात्र या पराभवामुळे कसोटी स्पर्धेतील न्यूझीलंडचे संकट आणखी वाढले आहे. त्यातच न्यूझीलंडचा अष्टपैलू कॉलिन डी ग्रँडहोम (Colin de Grandhomme) याला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे त्याला इंग्लंडसोबत सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडावे लागले आहे. त्यामुळे पुढील सामन्यात न्यूझीलंड आपले कमबॅक कसे करते आणि इंग्लंडचा पराभव करते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

लॉर्ड्स (Lords) कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ग्रँडहोमच्या टाचेला दुखापत झाली. ३५ वर्षीय ग्रँडहोमला आता दुखापतीतून सावरण्यासाठी १० ते १२ आठवड्याचा कालावधी लागेल. कॉलिन डी ग्रँडहोमच्या जागी आता अष्टपैलू मिचेल ब्रेसवेलचा उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे. (due to heel injury New Zealand Colin de Grandhomme out of England Tests)

- Advertisement -

सामन्यात ५ गडी राखून न्यूझीलंडला पराभव

या कसोटी मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात ५ गडी राखून न्यूझीलंडला पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे न्यूझीलंडचा संघ आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर इंग्लंड आठव्या क्रमांकावर आहे. दरम्यान या कसोटी मालिकेतील दुसरी दुसरी कसोटी शुक्रवारपासून ट्रेंट ब्रिज येथे सुरू होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूचा ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ पुरस्काराने गौरव

या पराभवामुळे न्यूझीलंडच्या संघाला सहाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरावे लागले. इंग्लंडच्या विजयाची टक्केवारी आता १२.५ टक्क्यांवरून १९.२३ टक्क्यांवर गेली आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३ पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया ७५ टक्के विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची विजयाची टक्केवारी ७१.४३ आहे. भारताचा संघ ५८.३३ टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी, श्रीलंकेचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे, त्यांची विजयाची टक्केवारी ५५.५६ आहे. पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा संघ (५२.३८) आहे. वेस्ट इंडिज (३५.७१) सहाव्या आणि बांगलादेश (१६.६७) नवव्या स्थानावर आहे.


हेही वाचा – येत्या काळात एकाच वर्षात दोन वेळा आयपीएल?, ‘या’ खेळाडूने दिला खास प्लॅन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -