घरक्रीडाIND vs SA : पावसाच्या सावटामुळे पहिल्या वनडे सामन्याच्या वेळेत बदल

IND vs SA : पावसाच्या सावटामुळे पहिल्या वनडे सामन्याच्या वेळेत बदल

Subscribe

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्याची वेळ बदलण्यात आली आहे. लखनऊच्या अटलबिहारी वाजपेयी एकना आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पहिला वनडे सामना आज खेळवला जाणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्याची वेळ बदलण्यात आली आहे. लखनऊच्या अटलबिहारी वाजपेयी एकना आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पहिला वनडे सामना आज खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने वनडे मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. (due to rain IND vs SA Lucknow ODI has been pushed by half an hour)

पावसाच्या विलंबामुळे नाणेफेक आणि सामन्याची वेळ अर्ध्या तासाने पुढे ढकलण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे नाणेफेक 1.30 वाजता होणार असून 2 वाजता सामना सुरू होणार आहे.

- Advertisement -

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका पार पडल्यानंतर आजपासून वनडे मालिकेचा थरार रंगणार आहे. भारतीय संघ वनडे मालिकेत शिखर धवनच्या नेतृत्वात असणार आहे, तर श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

वनडे मालिकेचे वेळापत्रक

- Advertisement -
  • पहिला वनडे सामना – 6 ऑक्टोबर, रांची
  • दुसरा वनडे सामना – 9 ऑक्टोबर, लखनौ
  • तिसरा वनडे सामना – 11 ऑक्टोबर, दिल्ली

भारतीय संघ :

शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर ( उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रजत पाटिदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चहर.

दक्षिण आफ्रिका संघ :

टेम्बा बवुमा ( कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिझा हेंड्रीक्स, हेनरिच क्लासेन, केशव महाराज, येनमन मलान, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल, एडिल फेहलुकवायो, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, तब्रेझ शम्सी.


हेही वाचा – जसप्रीत बुमराह T20 वर्ल्ड कपमधून बाहेर; शेवटची आशाही संपुष्टात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -