घरक्रीडाभारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाडची फ्लॉप खेळी; नेटकऱ्यांकडून ट्रोल

भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाडची फ्लॉप खेळी; नेटकऱ्यांकडून ट्रोल

Subscribe

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाजी ऋतुराज गायकवाडला सध्या चांगली फलंदाजी करता येत नाही आहे. फ्लॉप खेळीमुळे आता नेटकऱ्यांनी ऋतुराजला ट्रोल करण्यास सुरू केले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात ऋतुराजला चांगली कामगिरी करता आली नाही.

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाजी ऋतुराज गायकवाडला सध्या चांगली फलंदाजी करता येत नाही आहे. फ्लॉप खेळीमुळे आता नेटकऱ्यांनी ऋतुराजला ट्रोल करण्यास सुरू केले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात ऋतुराजला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलचा सामना करावा लागत आहे, तर त्याच्यावर मीम्सही बनवले जात आहेत. (due to the slow innings of Ruturaj gaikwad people are trolling him fiercely)

ऋतुराज गायकवाडने गुरुवारी लखनऊ येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाकडून वनडे पदार्पण केले. पण या सामन्यात ऋतुराज संघर्ष करताना दिसत होता. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेले 250 लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला चांगली सुरूवात करता आली नाही. पदार्पाणाच्या पहिल्या सामन्यात ऋतुराज उत्तम फलंदाजी करेल, अशी क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा रंगली होती. मात्र, गायकवाडला सेट व्हायला थोडा वेळ लागला, तरीही तो जास्त धावा करू शकला नाही. त्यामुळे त्याच्यावर मीम्सही बनवले जात आहेत.

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्सच्या संघातून ऋतुराज गायकवाडने उत्तम फलंदाजी केली. मात्र, पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात त्याला फारशी चांगली खेळी करता आली नाही. परंतू, पहिल्याच सामन्यात कमी धावा करत बाद झाल्याने पुढील वनडे सामन्यात त्याचे स्थान कठीण झाले आहे.

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात आफ्रिकेने 9 धावांनी भारताचा पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 240 धावांचे लक्ष्य भारतासमोर ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय खेळाडूंना चांगली सुरूवात करता आली नाही. त्यामुळे 40 षटकांच्या या सामन्यात भारतीय संघ केवळ 8 गड्यांच्या मोबदल्यात 240 धावा करू शकला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

- Advertisement -

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन वनडे मालिकेला सुरूवात झाली आहे. या मलिकेतील पहिला सामना गुरूवारी लखनऊच्या एकाना स्टेडियमवर झाला. मात्र, कालच्या पहिल्याच सामन्यावर पावसाचे सावट असल्याने सामना 40 षटकांचा खेळवण्यात आला होता. त्यावेळी प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी 40 षटकांत 240 धावा केल्या. सलामीवीर क्विंटन डीकॉक आणि यानेमन मलान यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली.


हेही वाचा – Ind vs SA : दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या वनडे सामन्यात भारताचा 9 धावांनी पराभव

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -