Dunith Wellalage : भारतीय संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेतील सुपर फोर सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 356 धावांचा डोंगर उभा करत सोमवारी (11 सप्टेंबर) 228 धावांनी मोठा विजय मिळवला होता. मात्र आज दुसऱ्याच दिवशी भारताची आक्रमक फलंदाजी श्रीलंकेच्या 20 वर्षीय गोलंदाजाच्या फिरकीच्या जाळ्यात अडकल्याचे पाहायला मिळाले. ड्युनिथ वेल्लालगे याने सर्वाधिक 5 विकेट घेत 22 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे. (Dunith Wellalage 20 year old Sri Lankan bowler breaks 22 year old record with 5 wickets)
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागिदारी रचली. मात्र त्यानंतर ड्युनिथ वेल्लालगेने पहिल्याच चेंडूवर शुभमन गिलची विकेट घेत भारतीय फलंदाजीला सुरूंग लावला. शुभमन गिल 25 चेंडूत केवळ 19 धावा करून बाद झाल्यानंतर ड्युनिट वेल्लालगेने विराट कोहली (3), रोहित शर्माला (53) लागोपाठ बाद करत भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले. यानंतर त्याने केएल राहुल आणि इशार किशन यांच्या चौथ्या विकेटसाठी झालेली 63 धावांची मजबूत भागिदारी मोडीत काढत भारताला आणखी एक धक्का दिला. त्याने केएल राहुलला (39) बाद केले आणि त्यानंतर हार्दिक पांड्यात (5) बाद केले.
हेही वाचा – IND vs SL : पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारतीय फलंदाजांनी केली निराशा; श्रीलंकेसमोर सपशेल लोटांगण
20 वर्षीय फिरकीपटू ड्युनिथ वेल्लालगे याने 10 षटकांत 40 धावा आपल्या पाच विकेट घेतल्या. तर चरिथ असलंकाने 4 विकेट घेत चांगली साथ दिली. याशिवाय तीक्ष्णता 1 विकेट मिळाली. त्यामुळे भारतीय संघ 50 षटके पूर्ण होण्याआधीच 213 धावांवर सर्वबाद झाला. अक्षर पटेलने शेवटच्या षटकात मोठे फटके मारताना श्रीलंका गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र तो 36 चेंडूंत 1 षटकाराच्या मदतीने 26 धावांच करू शकला.
Maiden Five-fer Alert! 🙌 Dunith Wellalage was on fire today, delivering an incredible performance! 🔥
Shubman Gill ☝️
Virat Kohli ☝️
Rohit Sharma ☝️
KL Rahul ☝️
Hardik Pandya ☝️#LankanLions #AsiaCup2023 #SLvIND pic.twitter.com/6ewfoYndNM— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 12, 2023
ड्युनिथ वेल्लालगे याने 22 वर्षे जुना विक्रम मोडला
श्रीलंकेचा युवा फिरकीपटू ड्युनिथ वेल्लालागे याने भारताविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यांत 9 विकेट्स घेत हरिस रौफ आणि तस्कीन अहमद यांच्यासोबत संयुक्तपणे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. एवढेच नाही तर त्याने भारताविरुद्ध पाच विकेट घेत एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच विकेट घेणारा तो श्रीलंकेचा सर्वात युवा गोलंदाज ठरला आहे. त्याने 22 वर्षे जुना विक्रम मोडला जो 2001 मध्ये चरित बुद्धिकाने याच्या नावावर होता.
हेही वाचा – IND vs PAK: पराभवानंतर बाबर आझम संतापला, चाहत्यांवर काढला राग ; पाहा व्हिडीओ
श्रीलंकेसाठी एकदिवसीय सामन्यात 5 विकेट घेणारे सर्वात युवा गोलंदाज
20 वर्षे 246 दिवस – ड्युनिथ वेललागे विरुद्ध भारत, कोलंबो, 2023
21 वर्षे 65 दिवस – चरिता बौद्धिका विरुद्ध झिम्बाब्वे, शारजाह, 2001
21 वर्षे 141 दिवस – थिसारा परेरा विरुद्ध भारत, डंबुला, 2010
21 वर्षे 241 दिवस – थिसारा परेरा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न, 2010
21 वर्षे 233 दिवस – उवैस करनैन विरुद्ध न्यूझीलंड, मोरातुवा, 1984
भारतीय फलंदाजांचे सपशेल लोटांगण
या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागिदारी केली. त्यानंतर श्रीलंकेच्या फिरकीपटूने भारतीय फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवण्यास सुरुवात केली. त्यामुळे भारतीय संघ सर्वबाद 213 धावांच करू शकला.