Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा ऑली रॉबिन्सनला शिक्षा झालीच पाहिजे; भारताच्या माजी क्रिकेटपटूचा ईसीबीच्या निर्णयाला पाठिंबा   

ऑली रॉबिन्सनला शिक्षा झालीच पाहिजे; भारताच्या माजी क्रिकेटपटूचा ईसीबीच्या निर्णयाला पाठिंबा   

रॉबिन्सनला शिक्षा झालीच पाहिजे. त्याला निलंबित करण्याचा ईसीबीने घेतलेला निर्णय योग्यच आहे.

Related Story

- Advertisement -

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) काही दिवसांपूर्वी वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले. रॉबिन्सनला मागील आठवड्यात न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. त्याने पदार्पण केल्यानंतर त्याची २०१२-१३ मधील काही वर्णभेदी आणि लिंगभेदी ट्विट्स सोशल मीडियावर व्हायरल झाली. या प्रकरणाची ईसीबी चौकशी करत असून ती पूर्ण होईपर्यंत रॉबिन्सनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येणार नाही. परंतु, रॉबिन्सनने दशकभरापूर्वी केलेल्या चुकीची शिक्षा त्याला आता देणे योग्य नसल्याचे मत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी व्यक्त केले होते. मात्र, जॉन्सन यांनी त्यांच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून केलेले विधान वाचून भारताचे माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनियर यांना धक्का बसला.

किंमत मोजलीच पाहिजे

मी वृत्तपत्रांमध्ये बोरिस जॉन्सन यांच्याविषयी काही गोष्टी वाचत आहे. पंतप्रधानांनी अशाप्रकारचे विधान करणे योग्य नाही. रॉबिन्सनला शिक्षा झालीच पाहिजे. त्याला निलंबित करण्याचा ईसीबीने घेतलेला निर्णय योग्यच आहे. त्याने चूक केली असून त्याची किंमत त्याने मोजलीच पाहिजे, असे इंजिनियर एका मुलाखतीत म्हणाले. इंजिनियर हे १९६८ ते १९७६ या कालावधीत इंग्लंडमधील कौंटी संघ लँकेशायरकडून खेळले होते. त्यावेळी त्यांनासुद्धा काही वेळा वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे वर्णभेद करणाऱ्यांना शिक्षा होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

गोष्टी हाताबाहेर जातील    

- Advertisement -

रॉबिन्सनने २०१२-१३ मध्ये ही वर्णभेदी आणि लिंगभेदी ट्विट्स केली होती. त्यावेळी तो १८ वर्षांचा होता. त्यामुळे त्याला फार युवा म्हणता येणार नाही. वयाच्या १८ व्या वर्षी तुम्हाला तुमची जबाबदारी माहित असते. क्रिकेटपटूंना त्यांच्या चुकीची शिक्षा न झाल्यास गोष्टी हाताबाहेर जातील. आशियाई लोकांना चिडवण्याची, त्यांच्याविरुद्ध काहीही बोलण्याची लोकांना सूट मिळेल. त्यामुळे वर्णभेदी टीका करणाऱ्यांना वेळीच शिक्षा होणे गरजेचे आहे, असेही इंजिनियर यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -